एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, थेट सोडली भाजपाची साथ, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीबद्दल घेतली वेगळी भूमिका
शिवसेना शिंदे गट आणि भाजपा राज्यात सत्तेत आहे. पण आता शिवसेना शिंदे गटाकडून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीबद्दल मोठी घोषणा करण्यात आली. राज्यात सत्ता मिळवल्यानंतर शिंदेंची नजर आता थेट उत्तर प्रदेशातकडे आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आगामी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेश आपल्या हातात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. काँग्रेस आणि समाजवादी पार्टी युती म्हणून या निवडणुकींना सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट आहे. याबाबत महत्वाची बैठकही पार पडली. भाजपाच्या हातून उत्तर प्रदेशची सत्ता घेण्यासाठी विरोधक एकत्र आली आहेत. भाजपानेही उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची जोरदार तयारी केली. काँग्रेसने दोन्ही पक्ष एकमेकांना सन्मानजनक जागा सोडतील, अशी आशा व्यक्त केली. उत्तर प्रदेशचे नेते प्रमोद तिवारी यांच्या घरी बैठकीचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काम करण्यासही सुरूवात केली. हेच नाही तर सीजेपीलाही भाजपाच्या विरोधात या निवडणुकीत मैदानात आणण्याच्या तयारीत अखिलेश यादव आहेत. अभिजीत दिपके काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. तशी तयारीही सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात आपल्या पक्षाची ताकद वाढवल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे लक्ष आता उत्तर प्रदेशकडे आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीबद्दल मोठा निर्णय घेतला.
उत्तर प्रदेशात 35 विधानसभा जागांवर उमेदवार देण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे. तब्बल 35 जागांवर शिवसेना शिंदे गट आपले उमेदवार उभे करेल. या निवडणुकीत शिंदे गटाचा अजेंडा हा हिंदुत्वाचा असणार आहे. प्रयागराजमध्ये राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्याकडून ही मोठी घोषणाक करण्यात आली. निवडणुकीची तयारीही सुरू करण्यात आली.
महाराष्ट्रात भाजपसोबत शिवसेना शिंदे गट सत्तेत आहे. पण उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. थेट भाजपाच्याविरोधात शिंदेंचा पक्ष निवडणूक लढवेल. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आहे. मथुरा मुद्द्यावर अडसूळ म्हणाले की, मथुरा भाजपचा मुद्दा… शिवसेनेचा मुद्दा हिंदुत्व… यूपीच्या राजकारणात शिंदे गटाच्या एन्ट्रीमुळे नवे राजकीय समीकरण तयार होणार का ? यावर चर्चा सुरू आहे.
