IND vs NZ : भारत-न्यूझीलंड टेस्ट सीरीजमधून हा गोलंदाज OUT, क्राइस्टचर्च मध्ये नाही खेळणार दुसरी टेस्ट
IND vs NZ : भारत-न्यूझीलंडमधील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिल्यानंतर आता सर्वांच लक्ष दुसऱ्या कसोटीकडे लागलं आहे. क्राइस्टचर्चमध्ये येत्या 27 नोव्हेंबरपासून दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा अखेरचा कसोटी सामना क्राइस्टचर्चमध्ये येत्या 27 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या टेस्टसाठी दोन्ही टीम्स वेलिंग्टनहून क्राइस्टचर्चला रवाना झाल्या आहेत. दरम्यान एका खेळाडूबद्दल महत्वाची अपडेट आहे. हा प्लेयर दुसऱ्या टेस्टमधून बाहेर गेला आहे. 27 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या क्राइस्टचर्च टेस्ट मध्ये हा प्लेयर खेळताना दिसणार नाही. वेलिंगटन कसोटीत ही हा प्लेयर प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. आता तो दुसऱ्या टेस्टमध्येही टीमचा भाग नसेल. ब्लेयर टिकनर क्राइस्टचर्च मधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचपूर्वी टीममधून आऊट झालाय.दुखापत हे त्यामागचं कारण आहे.
ब्लेयर टिकनर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आहे. हॅमस्ट्रिंग इंजरीमुळे तो टीमचा भाग नसेल. टिकनरच्या उजव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आहे. वेलिंगटन येथे ट्रेनिंग सेशन दरम्यान त्याला ही दुखापत झाली. ब्लेयर टिकनर बाहेर गेल्यानंतर न्यूझीलंडच्या टेस्ट टीममध्ये त्याच्याजागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या टीममध्ये वेगवान गोलंदाज ब्लेयर टिकनरच्या जागी मॅट फिशरच्या समावेशाची घोषणा करण्यात आली आहे. फिशर वनडे सीरीजमध्ये न्यूझीलंडच्या टीमचा भाग होता.
न्यूझीलंडच्या अडचणी वाढल्या
इंजरीमुळे मिचेल सँटनर देखील टेस्ट सीरीजमधून आऊट झाला. आता ब्लेयर टिकनरच्या इंजरीमुळे गोलंदाजीचा एक पर्याय कमी झाला असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ब्लेयर टिकनर न्यूझीलंडसाठी आतार्यंत 6 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 22 विकेट काढल्या आहेत.ब्लेयर टिकनरच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आलेल्या मॅट फिशरकडे फक्त एक कसोटी सामना खेळण्याचा अनुभव आहे. झिम्बाब्वे विरुद्ध टेस्ट मॅचमध्ये त्याने फक्त दोन विकेट काढले होते. भारताला विजयाची सर्वात जास्त शक्यता असूनही पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता.
View this post on Instagram
दुसऱ्या टेस्टसाठी न्यूझीलंड टीम
टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडल, डेवन कॉनवे, जेकब डफी, मॅट फिशर, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मॅट हेनरी, काइल जेमीसन, डॅरिल मिचेल, हेनरी निकल्स, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, विल यंग
