
जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञानकथेला आधुनिक चेहरा देणारे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला. डॉ. नारळीकर यांचं शिक्षण वाराणसी येथे झालं. 1957साली त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बी.ए.एम.ए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली. नारळीकर यांनी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एचडी आणि त्यांचा प्रवास सुरु झाला.
1966 साली जेव्हा हॉईल यांनी केंब्रीज येथे ‘इन्स्टिट्यूट ऑफ थिऑरॉटीकल अॅस्ट्रॉनॉमी’ नावाची जी स्वत:ची संस्था सुरू केली, त्यात डॉ. नारळीकरांचाही महत्त्वाचा वाटा होता. 1966 ते 1972 पर्यंत नारळीकर आणि हॉईल यांनी एकत्र काम केलं. गुरुत्वाकर्षणावर दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडला, तो ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ या नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध आहे.
जयंत विष्णू नारळीकर हे एक असे शास्त्रज्ञ होते ज्यांनी विश्वाच्या उत्पत्तीसारख्या गुंतागुंतीच्या विषयावर उल्लेखनीय योगदान दिले. एवढंच नाही तर अवकाशातील रहस्ये मुलांमध्ये लोकप्रिय केली. ते अनेकदा टेलिव्हिजन किंवा रेडिओवर लोकप्रिय विज्ञान व्याख्याने देताना देताना दिसले. सोप्या आणि सोप्या शब्दात मुलांना विश्वाची सफर घडवणारे नारळीकर यांनी आज शेवटचा श्वास घेतला.
जयंत नारळीकर हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे, विविध विषयांचे जाणकार आणि विज्ञान विषयातील तज्ज्ञ आहेत. विज्ञानाच्या जगात त्यांचे आदरणीय स्थान आहे आणि त्यांची कीर्ती केवळ देशातच नाही तर परदेशातही पसरली आहे. नारळीकर यांनी ब्रह्मांडातील अनेक परिवर्तन आणि नवे सिद्धांत जगासमोर प्रस्तुत केले. त्यांच्या अनेक मुलाखतींमधून त्यांनी जगाला विश्वाची रहस्ये सोप्या शब्दांत सांगितली. जयंत नारळीकर हे एक खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते त्यांनी या विषयांचा सखोल अभ्यास केला आहे.
1988 मध्ये, भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाने पुण्यात आंतर-विद्यापीठ अंतराळ विज्ञान केंद्राची स्थापना केली,. नारळीकर केंद्राचे संस्थापक-संचालक होते. तेव्हा त्यांनी स्टेडी स्टेट कॉस्मोलॉजीचं समर्थन केलं आणि ‘द बिग बँग’ सिद्धांत नाकारला.
जयंत नारळीकर यांना मिळालेले पुरस्कार
शास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञानकथेला आधुनिक वळण देणाऱ्या जयतं नारळीकर यांनी अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं होतं. स्मिथ पुरस्कार (1962), पद्मभूषण (1965), ॲडम्स पुरस्कार (1967), शांतीस्वरूप पुरस्कार (1979), इंदिरा गांधी पुरस्कार (1990), कलिंग पुरस्कार (1996) आणि पद्मविभूषण (2004), महाराष्ट्र भूषण पुरस्कार (2010) यांसारख्या अनेक पुरस्कारांनी जयंत नारळीकर यांना सन्मानित करण्यात आलं.