ब्लॅकआऊटदरम्यान ज्योती मल्होत्रासह इतर 4 जण काय करत होते? पाकिस्तानी हेरगिरी प्रकरणात धक्कादायक खुलासा
Jyoti Malhotra Pakistan Spying Case: ब्लॅकआऊट असताना भारतीयांच्या मनात होती भीती, तर ज्योती मल्होत्रासह इतर 4 जण काय करत होते? पाकिस्तानी हेरगिरी प्रकरणात धक्कादायक खुलासा, जाणून व्हाल थक्क

Jyoti Malhotra Pakistan Spying Case: युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या अडचणीत दिवसागणिक मोठी वाढ होत असल्याचं चित्र समोर येत आहे. ‘काही नाही उद्या – परवा माझी सुटका होईल…’ असं वडिलांना म्हणणाऱ्या ज्योतीबद्दल रोज नवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि इतर तिघांना अटक केली आहे. तर भारतीय सुरक्षा एजन्सींनी पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेला असलेला गंभीर धोका अधोरेखित केला आहे.
ऑपरेशन सिंदूर आणि उत्तर भारतातील ब्लॅकआउट सारख्या घटनांदरम्यान संशयास्पद हालचालींच्या पार्श्वभूमीवर चौघांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 मे म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या बरोबर एक दिवस आधी ज्योती दिल्ली येथे गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दानिश आणि इतर अधिकाऱ्यांच्या संपर्कात ज्योती होती. ही बैठक आधीच अनेक गुप्तचर संस्थांच्या रडारवर होती.
अटक केलेल्या आरोपींमध्ये युट्यूबर्सपासून ते सुरक्षा कर्मचाऱ्यांपर्यंत…
हरियाणी पोलिसांनी 13 मे पासून आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे. ज्यामध्ये हिसार येथे राहणारी ज्योती मल्होत्र जी युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. दुसऱ्या व्यक्तीचं नाव नौमान इलाही असं आहे. जो उत्तर प्रदेश येथे राहणारा असून पानीपर याथे सिक्योरिटी गार्ड आहे.
तिसऱ्या व्यक्तीचं नाव देवेंद्र सिंग ढिल्लो असं आहे. जो कैथल येथे राहणारा आहे. आणि चौथ्या व्यक्तीचं नाव अरमान असं आहे. या सर्वांवर पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी हेरगिरी करण्याचा आणि भारतीय संरक्षण संस्थांशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला सांगण्याचा आरोप आहे.
एजन्सींच्या अहवालात धक्कादायक खुलासे
हिसारचे एसपी शशांक सावन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मॉर्डन युद्धात फक्त गोळ्यांनी नाही तर Narrative Building देखील युद्ध करता येतं. मल्होत्रावर पाकिस्तानच्या बाजूने Narrative करण्याचे आरोप आहेत.’ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीचा खर्च तिच्या उत्पन्नापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. त्यामुळे ज्योतीच्या अनेक ट्रीप प्रायजोक असल्याचा देखील अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एजन्सी ज्योतीवर नजर ठेवून होती.
दहशतवादी संबंध आणि षड्यंत्र
विशेषतः अरमानच्या बाबतीत, एजन्सींना असे आढळून आले आहे की तो पाकिस्तान समर्थित दहशतवाद्याच्या संपर्कात होता. त्याने पाकिस्तानी एजन्टासाठी भारतीय मोबाईल सिम कार्डची व्यवस्था केली. एका संरक्षण प्रदर्शनात त्याने भाग घेतला आणि त्याची माहिती पाकिस्तानला पाठवली. तो नोकरी शोधत असल्याचा दावा करत नवी दिल्लीत संशयास्पदरीत्या फिरत राहिला. 15 मे च्या रात्री फिरोजपूर झिरका येथून अरमानला अटक करण्यात आली. याप्रकरणी तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत.