छोटा चिंटू म्हणत होता, तुमच्या शहरात चिकणी चमेली… इम्तियाज जलील यांचा जोरदार हल्ला
असदुद्दीन ओवैसी यांचा अहिल्यानगर दौराऱ्यात माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नितेश राणे यांचे नाव न घेता त्यांना छोटा चिंटू असे म्हटले तर संग्राम जगताप यांना चिकनी चमेली असा टोला लगावला आहे.

आपल्या आक्रमक भाषणशैलीमुळे कायम चर्चेत असलेले खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा अहिल्यानगर दौरा सुरु आहे. अहिल्यानगर येथील मुकुंदनगरच्या सी.आय.व्ही ग्राउंडवर ओवैसींची जाहीर सभा झाली. या सभेत माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आक्रमक भाषण केले. तसेच त्यांनी थेट कॅबिनेटमंत्री नितेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यवर सडकून टीका केली. त्यांनी नितेश राणे यांचे नाव न घेता त्यांना छोटा चिंटू असे म्हटले तर संग्राम जगताप यांना चिकनी चमेली असा टोला लगावला.
काय म्हणाले इम्तियाज जलील?
ही सभा 30 तारखेला होणार होती मात्र पोलिसांनी विनंती केली वातावरण खराब आहे. तेव्हा ओवेसी यांनी सांगितले की आपल्याला शांतता ठेवायची आहे. जेव्हा ओवेसी आले तेव्हा पोलिसांनी नोटीस दिली आणि काय बोलायचं ते सांगितले. आज तुम्ही सांगितले ते बोलतो मात्र जर अहिल्यानगरमध्ये कोणी सभेत मुस्लिम विरोधात बोलले तर आम्ही देखील गप्प बसणार नाही. जर कोणी बोलले तर आम्ही देखील बोलणार असे इम्तियाज जलील म्हणाले.
वाचा: एका आयटम साँगमुळे संपलं असतं माधुरीचं करिअर, बाळासाहेबांनी मिटवलेलं प्रकरण काय?
“आपली सभा चिकणी चमेली पण बघत आहे”
पुढे ते म्हणाले की, आता नवीन फॅशन आली राज्य करायचे असेल तर मुस्लिम विरोधात बोला. एक छोटा चिंटू पाहिले बोलत होता आता तुमच्या शहरात एक चिकणी चमेली आली आहे. माझं पोलिस रेकॉर्डिंग करत आहे मात्र मी कोणाच नाव घेतले नाही. आपली सभा चिकणी चमेली पण बघत आहे. तुम्ही रोज बाप तो बाप हे गाण एकता. आम्ही तुमच्या बापाला सोडले नाही आम्ही मोदींच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो. तेव्हा तू काय चीज? मी मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना विनंती करतो की संभाजीनगर रोडवरून तुमची गाडी घेऊन प्रवास करा. या रोडवरच डांबर कोण खात आहे?
मी कुणाचेही नाव घेतलेलं नाही, मीडियावाल्यांना काय चालवायचे ते चालवू द्यात, असे म्हणत जलील यांनी नाव न घेता आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, महाराष्ट्रात निवडणुका येत असून दंगली पेटवत माहोल खराब केला जातो आहे, असे जलील यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी म्हटले.
