AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Locdkown: औरंगाबादमधील इंग्रजी शाळांवर कोरोनामुळे गंडांतर; 40 टक्के इंग्रजी शाळा बंद पडणार

सध्या अनेक संस्थाचालक शाळा बंद करण्यासाठी शिक्षण विभागात चकरा मारत आहेत. हे चित्र अत्यंत विदारक आहे. | Coronavirus Locdkown

Locdkown: औरंगाबादमधील इंग्रजी शाळांवर कोरोनामुळे गंडांतर; 40 टक्के इंग्रजी शाळा बंद पडणार
शाळा बंद
| Updated on: May 15, 2021 | 9:47 AM
Share

औरंगाबाद: कोरोना आणि लॉकडाऊन अशा दुहेरी संकटाच्या कात्रीत सापडलेल्या औरंगाबाद शहरातील शिक्षणव्यवस्था आगामी काळात पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे. कारण, लॉकडाऊनमुळे (Locdkown) आर्थिक तोट्यात असलेल्या औरंगाबादमधील 40 टक्के इंग्रजी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. (40 english medium schools will shut down due to Lockdown in Aurangabad)

दोन वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून मिळणारे शैक्षणिक शुल्क ( फी) जवळपास आटले आहे. शिक्षकांचे पगार, शाळेच्या जागेचे आणि वाहनांचे भाडे थकले आहे. परिणामी आता या इंग्रजी शाळांच्या चालकांनी हा व्यवसाय बंद करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे हजारो शिक्षक आणि कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. सध्या अनेक संस्थाचालक शाळा बंद करण्यासाठी शिक्षण विभागात चकरा मारत आहेत. हे चित्र अत्यंत विदारक आहे.

औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या घटली

औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता घटताना दिसत आहे. शुक्रवारी दिवसभरात औरंगाबाद ग्रामीणमध्ये कोरोनाचे केवळ 655 रुग्ण मिळाले. तर शहरी भागात 218 रुग्ण मिळाले. सध्या रुग्णालयात 6857 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

लॉकडाऊनमुळे सराफा व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका; 800 कोटींचे नुकसान

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शुक्रवारी अक्षय्यतृतीयेचा सोने खरेदीचा (Gold) शुभमुहूर्त टळला गेला. त्यामुळे राज्यातील सराफा व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे समजते. सोन्या-चांदीची (Gold) दुकाने खुली ठेवण्यास परवानगी नसल्याने फक्त मुंबईतील सोने बाजाराचे जवळपास 800 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला. गेल्यावर्षी सोन्याने प्रतितोळा 56 हजारांपर्यंत उच्चांक गाठला होता. त्यावेळी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचा दर प्रतितोळा 52 हजारांच्या आसपास होता. तर यंदाच्या तृतीयेला सोन्याचा दर प्रतितोळा 49 हजार इतका होता.

संबंधित बातम्या:

लॉकडाऊनमध्ये राज्यातील व्यापार क्षेत्राचे तब्बल 70 हजार कोटीचे नुकसान – ललित गांधी

लॉकडाऊन वाढल्यामुळे व्यापारी ठाकरे सरकाविरोधात आक्रमक; तोडगा न काढल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

(40 english medium schools will shut down due to Lockdown in Aurangabad)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.