AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंध्रप्रदेशातून आलेला 39 किलो गांजा जप्त, तेलगू भाषिक आरोपींची चौकशी करताना औरंगाबाद पोलिसांची अडचण

तस्करांनी वेगवेगळी शक्कल लढवूनही शहर पोलिसांनी हा गांजा पकडल्याने मध्यंतरीच्या काळात तस्करांच्या रॅकेटवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे आता रेल्वेद्वारे प्रवासी म्हणून मजुरांना पाठवून तस्करी सुरू केली.

आंध्रप्रदेशातून आलेला 39 किलो गांजा जप्त, तेलगू भाषिक आरोपींची चौकशी करताना औरंगाबाद पोलिसांची अडचण
प्रातिनिधीक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 1:13 PM
Share

औरंगाबाद: शहरात रेल्वे स्थानकावर (Aurangabad Railway Station) आलेला 39 किलोचा गांजा उस्मानपुरा पोलिसांच्या पथकाने पकडला. औरंगाबादेत शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही कारवाई झाली. या कारवाईत दोन महिलांसह एका पुरुषाला अटक करण्यात आले. आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) विशाखापट्टणम् येथून हा गांजा औरंगाबादेत आणला गेल्याचे पोलिसांच्या (Aurangabad Police) चौकशीअंती समोर आले.

खबर मिळाल्यानंतर रचला सापळा

उस्मानपुरा पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना रेल्वे स्टेशनवर आंध्रप्रदेशातून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती त्यांच्या बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानंतर निरीक्षक गीता बागवडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सर्व परवानग्या मिळवत सापळा रचला. मिळालेल्या बातमीनुसार एक पुरुष आणि दोन महिला शुक्रवारी नऊ वाजता रेल्वेस्थानकातील पार्किंगमध्ये प्रवासी बॅगसह दाखल झाले. या आरोपींकडे चार बॅग होत्या. या सर्व बॅगची झाडा-झडती घेतली असता, त्यात प्लास्टिकच्या आवरणात 19 पाकिटं आढळून आली. त्यात तब्बल 39 किलो गांजा आढळला.

चौकशीसाठी दुभाषिकाची मदत

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आणणाऱ्यांना पकडले. मात्र पकडण्यात आलेल्या तिघांची चौकशी कशी करायची, हाच प्रश्न पोलिसांसमोर होता. कारण या तिघांनाही तेलगूशिवाय इतर कोणतीही भाषा येत नव्हती. आरोपींना त्यांचे नाव काय, हा प्रश्नही मराठीतून समजत नव्हता. त्यामुळे पोलिसांना त्यांच्याशी संवाद साधणे कठीण झाले. अखेर तेलगू भाषा येत असलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन दुभाषिकाच्या माध्यमातून आरोपींची चौकशी करण्यात आली. तसेच कोठडीत असतानाही या दुभाषिकाची मदत घेतली जाऊ शकते.

2 लाख 73 हजार रुपये किंमतीचा गांजा

विशाखापट्टणम् येथून आलेला हा गांजा सुमारे 2 लाख 73 हजार रुपये किंमतीचा आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये गोविंदा मनी आरली, लाऊ अम्मा रामू आरली आणि मनय्या अप्पाराव पिल्ले यांचा समावेश आहे. तीन आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.

गांजा शेतीचा सूत्रधार कोण?

मागील दोन वर्षांमध्ये नारेगाव, सिटी चौक, जिन्सी परिसरात विशाखापट्टणमवरून येणारा मोठा गांजा पकडला गेला. शहरातील मातब्बर तस्करांनी विशाखापट्टणम येथे बटाईने गांजाची शेती केली आहे. यापूर्वीच हा प्रकार लक्षात आला आहे. तस्करांनी वेगवेगळी शक्कल लढवूनही शहर पोलिसांनी हा गांजा पकडल्याने मध्यंतरीच्या काळात तस्करांच्या रॅकेटवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे आता रेल्वेद्वारे प्रवासी म्हणून मजुरांना पाठवून तस्करी सुरू केली. यात सदर प्रवासी रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर त्यांना बाबा चौकात उतरण्यास सांगितले जाते. त्यानंतर दुसऱ्या रिक्षात बसण्यास सांगून सदर एजंट रिक्षाचालकाला थेट पत्ता सांगून त्यांना तेथे घेऊन येण्यास सांगतो. पहिल्यांदाच गांजा तस्करीचा हा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एकदा गांजा पोहचवल्याने मिळतात 12 हजार विशाखापट्टणम येथील तोडवा, नलंका पिल्ली येथील हे आरोपी असून तेथे ते मजुरी करतात. सूत्रांच्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून ते औरंगाबादमध्ये तेथील गांजा व्यापाऱ्यांकडून गांजा घेऊन शहरातील एजंटला देण्यासाठी येत आहेत. एका टूरसाठी त्यांना बारा ते पंधरा हजार रुपये मिळतात, त्या व्यतिरिक्त रेल्वेचे तिकीट औरंगाबादचा एजंट काढून देतो.

इतर बातम्या- 

Aurangabad crime: पानदरीबा भागात धाडसी चोरी, इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे शटर उचकटून अडीच लाखांचे साहित्य लंपास

Aurangabad Crime: खिशात मोबाइल, काखेत ट्रान्समीटर, कानात मख्खी एअरफोन, औरंगाबादेत पोलिस चालक परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचे उघड

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.