AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | तरुणांना लाजवणारा उत्साह, आमदार हरिभाऊ बागडे नानांची सुसाट बाईक रॅली, दणक्यात घोषणाबाजी

औरंगाबादमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांनीही सुसाट बाईक रॅली काढली. नाना या नावाने लोकप्रिय असलेले हरिभाऊ बागडेंच्या रॅलीचा हा व्हिडिओ सध्या औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral Video) होतोय.

Aurangabad | तरुणांना लाजवणारा उत्साह, आमदार हरिभाऊ बागडे नानांची सुसाट बाईक रॅली, दणक्यात घोषणाबाजी
औरंगाबादेत हरिभाऊ बागडे यांची बाईक रॅलीImage Credit source: TV9 Marathi
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 07, 2022 | 10:57 AM
Share

औरंगाबाद | भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सर्वच भाजप नेते, कार्यकर्ते पक्षाचा प्रचार करत आहेत. औरंगाबादमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांनीही सुसाट बाईक रॅली काढली. नाना या नावाने लोकप्रिय असलेले हरिभाऊ बागडेंच्या रॅलीचा हा व्हिडिओ सध्या औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral Video) होतोय. त्याचं कारणही विशेष आहे. 78 वर्षीय हरिभाऊ नानांनी नेहमीच्या धोतरधारी वेशात अफलातून बाईक सवारी केलीय. एवढंच नाही तर बाइक चालवताना धोतर सावरत त्यांनी भारतीय जनता पार्टीची (BJP) घोषणाबाजीही केलीय. त्यांचा हा उत्साह पाहून कार्यकर्तेही थक्क झाले. औरंगाबादमधील इतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील या रॅलीत सहभागी होते.

निवडणुकांच्या तयारीला लागा- हरिभाऊ नाना

आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली शेंद्रा ते करमाड येथील हनुमान मंदिरापर्यंत बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा, असे आवाहन बागडे यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त औरंगाबाद तालुका भाजप व युवा मोर्चाच्या वतीने ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत भाजप तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके, माजी सभापती राधाकिसन पठाडे, सजनराव मते, सजन बागल, माजी सरपंच दत्तात्रय उकर्डे, साहेबराव दिघोळे, राधाकिसन भोसले, अप्पासाहेब शेळक आदी सहभागी होते.

बागडे नानांचा उत्साह थक्क करणारा

हरिभाऊ बागडे यांनी भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त भर उन्हात ही बाईक रॅली काढली. तरुणांनाही थक्क करणारा हा उत्साह होता. बाईकला भाजपाचा झेंडा लावलेला आणि तोंडाने भारतीय जनता पार्टीच्या विजयाची घोषणाबाजी हे चित्र कालच्या बाईक रॅलीत पहायला मिळाले. 1985 साली पहिल्यांदा आमदारकी मिळालेले हरिभाऊ बागडे हे सलग चार वेळा आमदार झाले. मनोहर जोशी यांच्या मंत्रालयात महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातही ते होते. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत फुलंब्री मतदारसंघातून त्यांना विजय मिळवला. त्या विधानसभा निवडणुकीतच त्यांचे वय पाहता आता निवडणूक लढवू नये, अशी चर्चा सुरु होती. मात्र बागडे यांच्या उत्साहापुढे हा दबाव टिकला नाही. त्यांनी उमेदवारी खेचून आणली. निवडणूक लढवली आणि जिंकलेदेखील. त्यामुळे आता 2024 मधील निवडणुकीतही हा उत्साह कायम राहतो की काय, अशी चर्चा आहे.

इतर बातम्या-

INS Vikrant: तुम्ही काय Xपटलं, तुम्ही काय कापलं सांगा?; संजय राऊतांचा पहिल्यांदाच थेट फडणवीसांवर हल्ला

Bhandara | मोहफुल वेचायला गेले अन् घामाघाम झाले, कालव्यात हातपाय धुवायला उतरले, बुडून काका-पुतण्याचा मृत्यू

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ