Aurangabad | आरोग्यमंत्री राजेश टोपेंची अपघात ग्रस्ताला मदत, आपल्या ताफ्यातील वाहनातून रुग्णालयात पोहोचवलं…

| Updated on: May 16, 2022 | 1:00 PM

राजेश टोपेंनी गाडीचा ताफा थांबवला. त्यांच्यासोबत पोलीस सुरक्षा रक्षकांचंही वाहन होतं. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमी तरुणाला तातडीने टोपेंनी मदत केली.

Aurangabad | आरोग्यमंत्री राजेश टोपेंची अपघात ग्रस्ताला मदत, आपल्या ताफ्यातील वाहनातून रुग्णालयात पोहोचवलं...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः एरवी राजकीय आरोप प्रत्यारोप करताना मागपुढे न बघणारे नेते..वेळ येते तेव्हा माणुसकीचं दर्शन घडवतात. अर्थात जालन्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे अत्यंत संयमी आणि शांत वृत्तीचे राजकारणी (Political Leaders) असून त्यांची वाणी देखील संयमित असते. याच टोपेंचं आणखी एक संवेदनशील रुप काल दिसून आलं. औरंगाबादमध्ये रात्रीच्या वेळी निवानस्थानी परतत असताना राजेश टोपेंनी एका दुचाकी स्वाराला अपघात (Road Accident) ग्रस्त अवस्थेत पाहिलं. एखादी मोठ्या पदावर असेलली व्यक्ती अशा वेळी रस्त्यावरून तशीच घरी निघून गेली असती. पण राजेश टोपे यांनी गाडीतून उतरून स्वतः ती घटना काय झाली आहे, हे पाहिलं आणि तरुणाची योग्य मदतही केली.

काय दिसतंय व्हिडिओत?

रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आपल्या वाहनातून रात्री 12 वाजता निवासस्थानी परतत होते. यावेळी त्यांनी एक दुचाकीस्वार अपघातग्रस्त अवस्थेत पाहिला. टोपेंनी गाडीचा ताफा थांबवला. त्यांच्यासोबत पोलीस सुरक्षा रक्षकांचंही वाहन होतं. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमी तरुणाला तातडीने टोपेंनी मदत केली. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या तरुणाला तत्काळ वाहनात बसवण्याच्या सूचना टोपेंनी दिल्या. तरुणाला उचलण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत टोपेंनीही मदत केली. नंतर पोलिसांच्या वाहनात त्याला बसवण्यात आलं. यावेळी तू टोपेंनी गाडीचा ताफा थांबवला. त्यांच्यासोबत पोलीस सुरक्षा रक्षकांचंही वाहन होतं. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमी तरुणाला तातडीने टोपेंनी मदत केली.वेक उत्तम भडके या तरुणांचं निधन झालं.

हे सुद्धा वाचा

हिंगोलीत अपघात, दोन ठार

हिंगोली ते नरसी नामदेव मार्गावर राहोली पाटीजवळ काल अपघात घडला. भरधाव कार आणि दुचाकीची धडक होऊन ही गंभीर घटना घडली. या अपघातात दोन तरुण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमी रुग्णावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. रविवारी साडे सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात ज्ञानेश्वर गजानन वाघमारे, विवेक उत्तम भडके या तरुणांचं निधन झालं