AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | पाणीप्रश्नी मनसेची आजपासून संघर्षयात्रा, 25 वर्षांपासूनच्या समस्येचा जाब विचारणार, मनसेचे 9 प्रश्न कोणते?

कुठे आठ दिवस तर कुठे नऊ दिवसांनी पाणी. त्यातही वेळ-अवेळी पुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त आहेत. भाजपच्या नेतृत्वात गेल्या महिन्यापासून काही आंदोलनं झालं. त्यानंतर महापालिकेने तातडीने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मात्र पाणीपुरवठ्याची समस्या अद्याप जैसे थेच आहे.

Aurangabad | पाणीप्रश्नी मनसेची आजपासून संघर्षयात्रा, 25 वर्षांपासूनच्या समस्येचा जाब विचारणार, मनसेचे 9 प्रश्न कोणते?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: May 14, 2022 | 6:00 AM
Share

औरंगाबादः भाजपच्या जलआक्रोशापूर्वीच मनसेने (MNS) औरंगाबादमधील पाणीप्रश्न (Aurangabad water issue) उचलून धरत संघर्ष यात्रा आयोजित केली आहे. आज 14 मेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहरातील पाणी प्रश्नावर मोठं आंदोलन केलं जात आहे. शहरातील प्रत्येक भागात फिरून नागरिकांकडून पाणी समस्येविषयीचे पत्र लिहून घेतले जाणार आहे. मागील 25 वर्षांपासून न सुटलेल्या या प्रश्नावर मनसेतर्फे नागरिकांकडून (Aurangabad citizens) 25 हजार पत्र लिहून घेतले जाणार आहे. हे पत्र एकत्रित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसणाऱ्या औरंगाबादकरांना पाणी प्रश्नानेही हैराण केलं आहे. कुठे आठ दिवस तर कुठे नऊ दिवसांनी पाणी. त्यातही वेळ-अवेळी पुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त आहेत. भाजपच्या नेतृत्वात गेल्या महिन्यापासून काही आंदोलनं झालं. त्यानंतर महापालिकेने तातडीने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मात्र पाणीपुरवठ्याची समस्या अद्याप जैसे थेच आहे.

मनसे 25 वर्षांपासूनच्या समस्येवर मनसेचे 09 प्रश्न काय ?

  1.  2012 मध्ये पाणीपट्टीमध्ये केलेली वाढ त्वरित 50 टक्क्यांनी कमी करण्यात यावी. लोकांनी 4050 रुपये पाणीपट्टी का भरावी?
  2.  सिडको-हडको येथे 45-50 MLD पाण्याचे नियोजन त्वरीत का करण्यात येत नाही?
  3. मनपाच्या 85 टँकर पैकी फक्त 40 टँकर व जीपीएस लावण्यात आले आहेत. उर्वरीत टँकरवर जीपीएस का लावण्यात आलेले नाही. पाणी चोरीसाठी मनपा आणि सत्ताधारी सोबत काम करीत आहेत का?
  4.  ज्या ठिकाणी टँकर भरले जातात, त्या ठिकाणी बारकोड यंत्रणा का बसवण्यात आली नाही? विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल का झाले नाहीत?
  5. शहरात 250 लाइनमन आहेत, या लाइनमनला धमक्या आणि त्रास नेहमीच दिल्या जातात. याची दखल आजपर्यंत का घेतली गेली नाही?
  6. हर्सूल तलाव ते जटवाडा नवीन लाइन एका आठवड्यात पूर्ण करण्याचा मानस आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे काम जमू शकते तर जायकवाडी ते नक्षत्रवाडी लाइनला 25 वर्षे वेळ का लागला?
  7. नवीन पाईप तयार होण्याची गती पाहता (दररोज 50 मीटर) नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी किमान दोन ते तीन वर्षे लागतील. लोकांनी हे का सहन करावे?
  8.  प्रधान सचिवांना निवडणुकीच्या तोंडावर कामाची पाहणी करण्यास पाठवले. मग एवढे दिवस ते कुठे होते?
  9.  किमान 16 MLD पाणी दररोज वाया जाते, म्हणजेच 1,50,000 लोकांना पुरेल इतके पाणी रोज वाया जाते. या गोष्टीला जबाबदार कोण?

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?