Aurangabad | औरंगाबाद महापालिकेच्या आराखड्यावरून राजकीय आखाडा, सर्वच राजकीय पक्षांचा नव्या रचनेला विरोध

वस्ती, मुख्य रस्ते, डीपी, रोड, तळे या नैसर्गिक हद्दी ओलांडू नये, असे नियम असताना तो न पाळून आराखडा तयार करण्यात आला आहे. यावर आमचा तीव्र आक्षेप आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय पक्षांनी दिली आहे.

Aurangabad | औरंगाबाद महापालिकेच्या आराखड्यावरून राजकीय आखाडा, सर्वच राजकीय पक्षांचा नव्या रचनेला विरोध
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 10:43 AM

औरंगाबादः मागील दोन वर्षांपासून निवडणुकांची वाट पाहणाऱ्या इच्छुकांची आणि औरंगाबादकरांची (Aurangabad) प्रतीक्षा अखेर संपली आहे. महापालिकेने 126 नगरसेवकांच्या (Corporator) निवडणुकीसाठी 42 प्रभागांच्या सीमा निश्चितीचा आराखडा गुरुवारी जाहीर केला. मात्र या आराखड्यावर (Ward structure) सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. नेत्यांनी आपला आक्षेप नोंदवला असून अनेक नागरिकांनाही आपली कॉलनी किंवा वसाहत नेमक्या कोणत्या प्रभागात गेलाय, हे स्पष्टपणे कळत नसल्याचं सांगितलं आहे. महानगरपालिकेने येत्या 16 जूनपर्यंत या आराखड्यावरील हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी मुदत दिली आहे. या हरकतींची माहिती 17 जून रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली जाईल. त्यानंतर 24 जूनपर्यंत आयोगातर्फे नियुक्त अधिकाऱ्यांसमोर यासंदर्भात सुनावणी होईल. मात्र राजकीय पक्षांनी या आराखड्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

राजकीय पक्षांचे आक्षेप काय?

– शिवसेना- राजेंद्र जंजाळ- माजी उपमहापौर– वस्ती, मुख्य रस्ते, डीपी, रोड, तळे या नैसर्गिक हद्दी ओलांडू नये, असे नियम असताना तो न पाळून आराखडा तयार करण्यात आला आहे. यावर आमचा तीव्र आक्षेप आहे. – शिवसेना गटनेते- राजू वैद्य- अनेक ठिकाणी प्रस्थापित वॉर्ड विविध भागांत विभागण्यात आला आहे. क्रांती चौक वॉर्डाचेही असेच तुकडे करण्यात आले आहेत. याला आम्ही विरोध करणार आहोत. – भाजप- राजू शिंदे- माजी उपमहापौर- दलित मुस्लिम वसाहतीचे ईबी प्रगणक गटातील भाग मुद्दाम भाजपच्या वॉर्डाला जोडले आहेत. यामुळे भाजपाला नुकसान होण्याची खबरदारी घण्यात आलेली दिसते. राजकीय दबावाखाली हा आराखडा तयार करण्यात आला असून याला आमचा आक्षेप आहे. – राष्ट्रवादी शहराध्यक्ष खाजा शरफोद्दीन- नव्या प्रभाग रचनेत हद्दीचे विभाजन योग्य पद्धतीने झालेले नाही. अनेक वॉर्डात हेच चित्र आहे. त्यावर आम्ही आक्षेप घेणार आहोत. – MIM गटनेते- नासेर सिद्दिकी- 2015 मधील निवडणुकीत शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या 10 लाखांच्या जवळपास होती. आता ती अचानक साडेबारा लाख कशी झाली, याबाबत साशंकता आहे. आम्ही यावर आक्षेप नोंदवणार आहोत.

हे सुद्धा वाचा

मतदार- उमेदवारांची स्थिती काय?

– महापालिकेच्या हद्दीत 12 लाख 28 हजार 032 एकूण मतदार आहेत. – 2 लाख 38 हजार 105 अनुसूचित जातींचे मतदार आहेत. – 16,320 अनुसूचित जमातींचे मतदार आहेत. – एकूण प्रभाग- 42 – प्रत्येक प्रभागात सरासरी मतदार 29,239 -एकूण नगरसेवक- 126 (प्रत्येक प्रभागात 3 नगरसेवक) – अनु. जाती नगरसेवक- 24 (महिलांसाठी राखीव 12) – अनु. जमाती नगरसेवक- 02 (महिलांसाठी राखीव 01) – सर्वसाधारण नगरसेवक – 100 (महिलांसाठी राखीव 50)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.