लिचेडच्या पाण्याचे औरंगाबाद महापालिका करणार शुद्धीकरण, कचऱ्यापेक्षाही तिपटीने घातक लिचेड

| Updated on: Sep 21, 2021 | 2:37 PM

औरंगाबाद: शहरातील चिकलठाणा आणि पडेगाव येथील कचरा प्रक्रिया (Chilkalthan and Padegaon Waste management project) प्रकल्पातील लिचेडच्या पाण्याचेही आता शुद्धीकरण केले जाईल, असे महापालिकेच्या (Aurangabad Municipal corporation) वतीने सांगण्यात आले आहे. पावसाळ्यात या कचऱ्यातून निघडणारे ‘लिचेड’ परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. चिकलठाणा प्रकल्पातील हे लिचेड तर थेट नाल्यात जात असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी दोन वेळा […]

लिचेडच्या पाण्याचे औरंगाबाद महापालिका करणार शुद्धीकरण, कचऱ्यापेक्षाही तिपटीने घातक लिचेड
औरंगाबादेतील कचरा प्रकल्पातील लिचेडच्या पाण्यावरही शुद्धीकरण प्रक्रिया केली जाणार.
Follow us on

औरंगाबाद: शहरातील चिकलठाणा आणि पडेगाव येथील कचरा प्रक्रिया (Chilkalthan and Padegaon Waste management project) प्रकल्पातील लिचेडच्या पाण्याचेही आता शुद्धीकरण केले जाईल, असे महापालिकेच्या (Aurangabad Municipal corporation) वतीने सांगण्यात आले आहे. पावसाळ्यात या कचऱ्यातून निघडणारे ‘लिचेड’ परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. चिकलठाणा प्रकल्पातील हे लिचेड तर थेट नाल्यात जात असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी दोन वेळा आंदोवलन करून या प्रकल्पाला कुलूप ठोकले होते. त्यामुळे आता या लिचेडचीही विल्वेवाट लावण्यासाठीच्या हालचाली महापालिकेने सुरु केल्या आहेत.

लाखो लीटरचे लिचेड टँक

चिकलठाणा आणि पडेगाव प्रकल्पात लिचेडसाठी लाखो लीटर क्षमतेचे टँक तयार करण्यात आले आहेत. मात्र पावसाळ्यात हे टँक ओव्हरफ्लो होत आहेत. त्यापैकी चिकलठाणा प्रकल्पातून निघणारे लिचेड थेट शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने येथील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत दोन वेळा आंदोलन केले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने आता पावले उचलली आहेत. लिचेडचीही विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्न मार्गी लागेल, असे मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.

लिचेड म्हणजे नेमके काय?

एखाद्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात वर्षानुवर्षे कचऱ्याचे ढीग लागलेले असतात. त्यावर पावसाचे पाणी पडल्यानंतर या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून सेमी लिक्विड अर्थात घट्ट असा काळा द्रव बाहेर येत असतो. हे पाणी कचऱ्यापेक्षाही अत्यंत घातक असते. 1 मिली लिचेड हे तीन लीटर घाण तयार करू शकते. औरंगाबादच्या चिकलठाणा कचरा प्रक्रिया प्रकल्पातून वाहून जाणारे हे लिचेड थेट आजूबाजूच्या नाल्यात जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. गंभीर बाब म्हणजे या लिचेडच्या पाण्यावर वेळीच नियंत्रण केले नाही तर आजूबाजूच्या जमिनीवर पसरत जाणारे हे लिचेड भूगर्भातील पाणीसाठाही दुषित करू शकते व त्यातून मोठ्या प्रमाणावर शेतीला नुकसान व रोगराई पसरू शकते, त्यामुळे यासंबंधी लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

कसे करणार लिचेडचे शुद्धीकरण?

कचऱ्यातून निघणाऱ्या घातक लिचेडचे शुद्धीकरण करण्यासाठी तीन महापालिकेसमोर तीन पर्याय होते. त्यात शेड टाकणे, लिचेड टँकचे आउटलेट ड्रेनेजनाइनमध्ये सोडणे किंवा केमिकलच्या मदतीने प्रक्रिया करणे या पर्यायांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी केमिकलच्या मदतीने प्रक्रिया करण्याचा पर्याय योग्य असल्याचे महापालिकेच्या अभ्यासात समोर आले. यानुसारच आता पुढील प्रस्ताव तयार केला जात आहे. शहरातील अशुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी एसटीपी प्लांट तयार करण्यात आला आहे. त्याच पद्धतीचा प्लांट उभा करून लिचेडचे पाणी त्यात टाकून या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येईल व शिल्लक गाळातून खतनिर्मिती करण्यात येईल, अशी माहिती मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे दिली.

कचऱ्याचे डोंगर रसायन टाकून कमी करणार

शहरात दररोज सुमारे 150 टन घनकचरा जमा होतो. हा कचरा नारेगाव, चिकलठाणा आणि पडेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात जमा होतो. यापैकी प्रक्रिया न झालेल्या कचऱ्याचे डोंगर गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेसमोर प्रश्नचिन्ह घेऊन उभे आहेत. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेतर्फे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी रसायन टाकून या कचऱ्याचे विघटन करणे हा एक उपाय आहे. तसेच शास्त्रशुद्ध पद्धतीने हा कचरा जमिनीतही पुरण्यात येणार आहे.

इतर बातम्या- 

औरंगाबाद पालिका निवडणुकीसाठी भाजपचा स्वबळाचा नारा, बड्या मंत्र्याचे स्पष्ट संकेत, शिवसेनेची कोंडी ?

औरंगाबाद महापालिकेची उद्यापासून राष्ट्रीय जंतनाशक मोहीम, 1 ते19 वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देणार