AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad News: शहरातील मालमत्तांची जानेवारीपासून घरोघरी जाऊन मोजणी, ड्रोन इमेजसोबत पडताळणी!

औरंगाबाद शहरात 1 जानेवारी 2022 पासून महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन मालमत्तांचे प्रत्यक्ष मॅपिंग करणार आहेत. त्यानुसार मालमत्ता कर आकारला जाईल.

Aurangabad News: शहरातील मालमत्तांची जानेवारीपासून घरोघरी जाऊन मोजणी,  ड्रोन इमेजसोबत पडताळणी!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 31, 2021 | 7:00 AM
Share

औरंगाबादः जीआयएस अर्थात जिओग्राफिक इन्फर्मेशन सिस्टिमद्वारे (GIS) शहरातील मालमत्तांची मोजणी करण्याचा प्रयोग शहरात महापालिकेद्वारे राबवला जात आहे. आता नवीन वर्षात जीआयएसद्वारे मॅपिंग झालेल्या मालमत्तांचे घरोघरी जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाणार आहे. झोन क्रमांक तीन आमि चारपासून या सर्वेक्षणाची सुरुवात होईल, अशी माहिती महापालिका (Aurangabad Municipal corporation) उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली.

स्मार्ट सिटीच्या मामातून मॅध्यपिंग पूर्ण

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील मालमत्तांचे ड्रोनद्वारे काढलेल्या सर्व इमेजची आता पडताळणी करण्यात येणार आहे. शहराचा एकूण परिसर 170 चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी 135 चौरस किलोमीटर जागेचे फोटो ड्रोनद्वारे काढण्यात आले. शहरात सध्या पाच लाखांपेक्षा जास्त घरे असतील, मात्र मनपाकडे 2 लाख 50 हजार मालमत्तांची नोंद आहे. त्यापैकी 2 लाख मालमत्ताधारक कर भरतात. हे मॅपिंग आणि प्रत्यक्ष पडताळणी झाल्यावर शहरातील मालमत्तांचे चित्र स्पष्ट होील.

1 जानेवारीपासून स्वतंत्र फॉर्म वितरित करणार

महानगरपालिकेचे कर्मचारी 1 जानेवारीपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील. मालमत्ताधारकांना एक स्वतंत्र फॉर्म दिला जाईल. यात विद्युत मीटर क्रमांक, आधार कार्ड, पॅन नंबर, नळ कनेक्शन, ईमेल , बांधकामाचे क्षेत्रफळ, मजले आदी माहिती असेल. ही सर्व माहिती मालमत्ता क्रमांकासोबत जोडली जाईल. कर्मचारी कर लावण्यासाठी घराचे मोजमाप घेतील. त्यानुसार, मालमत्ता कराची पुनरआकारणी होईल. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनपाचे आयकार्ड व ड्रेसकोड देण्यात येणार आहे. तसेच जीआयएस तसेच ड्रोनद्वारे ज्या मालमत्तांचे सर्वेक्षण झाले आहे, त्याची पडताळणीही उपरोक्त माहितीशी केली जाईल. त्यानंतर हा सर्व डाटा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होईल. दुसऱ्या टप्प्यात सर्वेक्षण करणारे कर्मचारी वाढवण्यात येतील. कर संकलन विभागात वॉररुमही तयार करण्यात येईल, अशी माहिती अपर्णा थेटे यांनी दिली.

इतर बातम्या-

 Ajit Pawar | पहाटेच्या शपथविधीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले

TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेला सोडचिठ्ठी देणार जेठालाल उर्फ दिलीप जोशी?

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?