स्वच्छ दिवाळीसाठी औरंगाबाद मनपाचे सूक्ष्म नियोजन, कचऱ्याचा वेळीच बंदोबस्त करणार!

| Updated on: Oct 24, 2021 | 3:26 PM

शहरातील विविध वसाहतींमधील कचरा वेळेत जमा व्हावा, असे योग्य नियोजन करण्याचे कंत्राटदाराला सांगण्यात आले आहे. तसेच बाजारपेठेतील कचराही दिवसातून दोन वेळेस उचलण्याच्या सूचना केल्या आहेत.

स्वच्छ दिवाळीसाठी औरंगाबाद मनपाचे सूक्ष्म नियोजन, कचऱ्याचा वेळीच बंदोबस्त करणार!
दिवाळीत घरोघरी कचरा साठणार नाही, यासाठी महापालिकेचे नियोजन
Follow us on

औरंगाबादः सणासुदीचे दिवस असल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर (Diwali festival) महापालिकेनेही काटेकोर नियोजन करायला सुरुवात केली आहे. दिवाळीच्या काळात शहरातील कचऱ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होते. शहरात विविध वसाहतींमध्ये, कचरा कुंड्यांवर कचरा साचून राहू नये, यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey ) यांनी दिल्या आहेत.

अधिकारी वेळोवेळी पाहणी करणार

महापालिकेतील घनकचरा विभागाने विविध कॉलन्यांमध्ये कचरा साठू नये, यासाठी पुरेशी खबरदारी घेतली आहे. खासगी कंपनीमार्फत जास्तीत जास्त कचरा उचलण्यात येईल, असे नियोजन करण्यात आले आहे. या कामासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारीही दिवाळीपर्यंत वेळोवेळी पाहणी करणार आहेत.

रेड्डी कंपनीला कंत्राट

महापालिकेने शहरातील कचरा संकलनाचे काम बंगळुरू येथील रेड्डी कंपनीला दिले आहे. एक मेट्रिक टन कचरा कंपनीने जमा करून प्रक्रिया केंद्रावर नेल्यास महापालिका 1680 रुपये देते. मागील काही दिवसांपासून कंपनीने दारोदार जाऊन कचरा गोळा करण्यावर भर दिला आहे. दिवळीच्या काळात अनेक नागरिक घराची रंगरंगोटी व सफाई करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर येतो. बाजारपेठेत व्यापारी सामान आणतात. सुका कचरा बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात निघतो. हा कचरा दोन वेळेस जमा करण्याच्या सूचना कंपनीला दिल्या आहेत, अशी माहिती उपायुक्त सौरभ जोशी यांनी दिली.

वसाहतींचेही नियोजन करण्याच्या सूचना

शहरातील विविध वसाहतींमधील कचरा वेळेत जमा व्हावा, असे योग्य नियोजन करण्याचे कंत्राटदाराला सांगण्यात आले आहे. सध्या नागरिकांनी साफ-सफाई सुरु केली असून कचऱ्यात वाढ झाली आहे. पूर्वी 475 मेट्रिक टन कचरा जमत होता. आता मात्र हे प्रमाण 500 मेट्रिक टन पर्यंत पोहोचले आहे. दिवाळीपूर्वी 25 ते 30 मेट्रिक टन आणखी कचरा वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

115 वॉर्डांमध्ये कचरा संकलन, 320रिक्षा, 29 वाहने

शहरातील 115 वॉर्डांमधील कचरा संकलन रेड्डी कंपनीकडून करण्यात येत आहे. कंपनीकडे सध्या 320 रिक्षा आहेत. काही वॉर्डांची भौगोलिक रचना मोठी असल्याने तेथए दोन ते तीन रिक्षा देण्यात आल्या आहेत. रिक्षांमधून जमा होणारा कचरा प्रक्रिया केंद्रांवर नेण्यासाठी मोठी 29 वाहने आहेत. दिवाळीत या सर्व वाहनांची काम करण्याची गती वाढवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इतर बातम्या-

तोंडोळी दरोडाः म्होरक्यासह एकाला बेड्या, 5 अद्याप फरार, आरोपींकडे मोबाइल नसल्याने लोकेशन शोधण्याचे आव्हान!

औरंगाबाद जिल्ह्यात 113 गावांना सौर मोटरपंपाद्वारे पाणीपुरवठा, 1245 गावात योजनांची पुनर्बांधणी