Aurangabad Forecast : शहरात पावसाचे ‘लॉकडाऊन’ संपले, पुढील आठवडाही निरभ्र

| Updated on: Aug 25, 2021 | 3:47 PM

23 ऑगस्टनंतर पावसाने पुन्हा एकदा विश्रांती घेतली. त्यानंतरही आकाश निरभ्र असून पुढील आठवडाभर तरी असेच हवामान कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.

Aurangabad Forecast : शहरात पावसाचे लॉकडाऊन संपले, पुढील आठवडाही निरभ्र
Rain Update
Follow us on

औरंगाबाद–  शहरात 15 ऑगस्टनंतर सुरु झालेल्या संततधार पावसाने औरंगाबादकरांसाठी नवेच ‘लॉकडाऊन’ लावले होते. मागील आठवड्यात दिवसभर पावसाची झड सुरु होती. सततच्या  पावसाच्या रिपरिपीमुळे दुकाने व बाजारपेठा उघडल्यानंतरही नागरिकांना खरेदीसाठी बाजारात न जाता घरातच बसून रहावे लागले. मात्र 23 ऑगस्टनंतर पावसाने पुन्हा एकदा विश्रांती घेतली. त्यानंतरही आकाश निरभ्र असून पुढील आठवडाभर तरी असेच हवामान कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे. आज बुधवारी, शहराचे तापमान किमान 30 अंश सेल्सियस आणि कमाल 22 अंश सेल्सियस एवढे नोंदवले. (Aurangabad Rain Update) शहरातील हवेचा दर्जा चांगला असून वाऱ्याचा वेग ताशी 6.4 किमी असा राहिल. (Aurangabad rain and weather latest update in Marathi today)

 

2, 3 सप्टेंबर रोजी पावसाचा अंदाज-औंधकर

शहरातील एमजीएम येथील एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक आणि प्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने 1,2 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळू शकतात. यात नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश होतो. तसेच 2 आणि 3 सप्टेंबर रोजी जालना, औरंगाबाद, नाशिकमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ऐन राखीपौर्णिमा पावसात 

15 ऑगस्टपूर्वी लागून आलेल्या सुट्या आणि राखीपौर्णिमेच्या दृष्टीने सामान्य नागरिकांसाठी मागील आठवडा महत्त्वाचा होता. मात्र या दिवसात पावसाने दमदार बॅटिंग केल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यास अडचणी आल्या. शहरात जागोजागी रस्ते दुरूस्ती आणि पूल बांधणीची कामं सुरु असल्याने रस्तेही निसरडे झाले होते. त्यामुळे नागरिकांच्या राखीपौर्णिमेनिमित्तच्या खरेदीच्या मूडवरही परिणाम झाला. अशा स्थितीतही अनेकांनी पावसात भिजत खरेदीचा आनंद लुटला.

इतर बातम्या

Weather Update : दडी मारलेला मान्सून पुन्हा परतणार, येत्या 4 ते 5 दिवसांत सक्रिय होणार

Weather Forecast: आयएमडीकडून ऑगस्ट सप्टेंबरसाठी हवामानाचा अंदाज जारी, महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहणार?

(Aurangabad Weather- Rain break in Aurangabad and region )