PHOTO | संत एकनाथ रंगमंदिराचा पडदा आज उघडणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन, स्थानिक नेत्यांची उपस्थिती!

| Updated on: Jan 25, 2022 | 2:20 PM

आज सायंकाळी सात वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने संत एकनाथ रंगमंदिराचे उद्घाटन होणार आहे. तर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, नगरविकास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री संदिपान भूमरे, मंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील यांची उद्घाटन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असेल.

PHOTO | संत एकनाथ रंगमंदिराचा पडदा आज उघडणार, मुख्यमंत्र्यांच्या  हस्ते ऑनलाइन उद्घाटन, स्थानिक नेत्यांची उपस्थिती!
Follow us on

औरंगाबादः शहरातील सांस्कृतिक चळवळींचे केंद्र असलेले संत एकनाथ रंगमंदिर (Sant Eknath Rangmandir) खुले होण्यासाठी सज्ज झआले आहे. मागील चार वर्षांपासून हे नाट्यगृह बंद होते. मागील वर्षात नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. हे रंगमंदिर आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोयी सुविधांनी युक्त झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने रंगमंदिराचे उद्घाटन केले जाईल. तर प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) आज मंगळवारी 25 जानेवारी रोजी या रंगमंदिराचे उद्घाटन करतील.

8 कोटींच्या निधीतून नूतनीकरण

शहरातील गुरुगोविंद सिंहपुरा भागात संत एकनाथ रंगमंदिराची उभारणी झालेली आहे. परंतु मागील काही वर्षांपासून नाट्यगृहाची दुरवस्था झाली होती. आता मनपाने या नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले. या कामावर 8 कोटी रुपये खर्च करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत 7 कोटी आणि स्मार्ट सिटीद्वारे 82 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या निधीतून नवीन स्टेज वूडन फ्लोरिंग, प्रेक्षागृहात नवीन खुर्च्या बसवल्या असून प्रेक्षागृहात कार्पेट टाकण्यात आले आहे. ग्रीन रुम अद्ययावत, छताचे फॉलसीलिंग, वॉल ऑकोस्टिक, वातानुकुलित यंत्रणा बसवली आहे. संपूर्ण इमारतीचे छताचे पत्रे बदलले, इमारतीला रंग रंगोटी करण्यात आली आहे.

नव्या रंगमंदिरात नवे ट्रान्सफॉर्मवर, अद्ययावत प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेजचे स्वयंचलित पडदे, स्टेज लायटिंग व पूर्ण इमारतीत व इमारतीच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा

आज सायंकाळी सात वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने संत एकनाथ रंगमंदिराचे उद्घाटन होणार आहे. तर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, नगरविकास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री संदिपान भूमरे, मंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील यांची उद्घाटन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असेल.

इतर बातम्या

गाडीवर तिरंगा फडकावणं गुन्हा आहे? जाणून घ्या तिरंगा कुठं लावावा आणि तिरंग्याचा अपमान नेमका कशामुळे होतो?

अवकाळी, गारठ्यानंतर आता द्राक्ष बागायतदारांसमोर वेगळेच संकट, अंतिम टप्प्यात बागा सावरतेल का?