AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO| औरंगाबादेत शिवरायांचा भव्य पुतळा अखेर विराजमान, 48 तासांचे अथक प्रयत्न, पुढची शंभर वर्षे प्रेरणास्थान ठरणार!

अवघी रात्र मेहनत केल्यानंतर अखेर मंगळवारी पहाटे महाराजांचा पुतळा चौथऱ्यावर चढवण्यात यश आलं. मंगळवारी 25 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास हा पुतळा क्रेनच्या सहय्याने चौथऱ्यावर विराजमान झाल्याची माहिती शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख यांनी दिली.

PHOTO| औरंगाबादेत शिवरायांचा भव्य पुतळा अखेर विराजमान, 48 तासांचे अथक प्रयत्न, पुढची शंभर वर्षे प्रेरणास्थान ठरणार!
औरंगाबादेत शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान
| Updated on: Jan 25, 2022 | 1:06 PM
Share

औरंगाबादः शहरातील बहुचर्चित शिवरायांचा पुतळा (Aurangabad Shivaji Maharaj Statue) अखेर क्रांती चौकातील चौथऱ्यावर विराजमान करण्यात आला. रविवारी पहाटे शिवरायांचा हा पुतळा औरंगाबादेत आला. त्यानंतर त्याची रंगरंगोटी आणि इतर थोडे काम बाकी होते. सोमवारी रात्रीच या पुतळ्याला चौथऱ्यावर चढवण्याचे काम करण्यात येणार होते. अवघी रात्र मेहनत केल्यानंतर अखेर मंगळवारी पहाटे महाराजांचा पुतळा चौथऱ्यावर चढवण्यात यश आलं. मंगळवारी 25 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास हा पुतळा क्रेनच्या सहय्याने चौथऱ्यावर विराजमान झाल्याची माहिती औरंगाबाद शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख यांनी दिली.

पहिला क्रेन अपुरा, पहाटे दुसरा क्रेन मागवला

Crain देशातील सर्वात उंच असा शिवरायांचा पुतळा असून त्याची उंची 21 फूट आहे. तर त्यासाठी क्रांती चौकात बनवण्यात आलेल्या नव्या पुतळ्याची उंची 31 फूट एवढी आहे. पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी 2.5 कोटी रुपये खर्च आला आहे. तर नव्या पुतळ्यासाठी 1 कोटी रुपये खर्च आला आहे. पुतळ्याचे एकूण वजन 10 टन एवढे झाले आहे. पुतळा चौथऱ्यावर चढवण्यासाठी आधी 8 टन वजन क्षमतेचे क्रेन आणले होते. सोमवारी रात्री त्याद्वारे पुतळा चढवण्याचे काम सुरु झाले. मात्र तो अपुरा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मंगळवारी पहाटे ऐनवेळी 12 टन वजन क्षमतेचा क्रेन मागवण्यात आला आणि पुतळा अखेर विराजमान करण्यात आला.

फेब्रुवारीत अनावरण

Statue

शिवरायांचा अश्वारुढ पुतळा क्रांती चौकात विराजमान झाला आहे. आता त्यावर आवरण टाकून झाकून ठेवण्यात आला आहे. येत्या फेब्रुवारीत शिवरायांच्या या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. मात्र याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आणि शुभमुहूर्तावर नव्याने तयार करण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण कार्यक्रम व्हावा अशी मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे जिल्हा शिवजयंती उत्सव समितीने पत्राद्वारे केली आहे.

Shivaji Maharaj Statue Aurangabad गेल्या अनेक वर्षापासून क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतीक्षा जिल्ह्यातील शिवप्रेमींना होती. रविवारी उशिरा रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन झाल्यानंतर औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या हस्ते सोमवारी पहाटे विधिवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले.

Instrument pooja, Aurangabad येत्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असून यासाठी विविध ठिकाणी शिवप्रेमींची तयारी सुरु झाली आहे. एसटी कॉलनी येथील ज्ञानेश विद्या मंदिर येथे शिवकुंज फाउंडेशन प्रणित रणझुंजार ढोलपथकाचे वाद्यपूजन औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. शिवकाळापासून पारंपारिक वाद्यांचे एक वेगळे महत्व आहे. या वाद्यामुळे आपली मराठमोळी संस्कृती अभिव्यक्त होते. आजच्या बदलत्या काळामध्ये वाद्य जरी बदलले असले तरी पारंपारिक असलेले ढोल, ताशे, झांज, लेझीम याचे महत्व कधीच कमी झाले नाही. शिवकालीन वाद्यांची संस्कृती आजच्या तरुण पिढीने जोपासावी आणि ही परंपरा कायम पुढे सुरु ठेवावी असे आवाहन त्यांनी यावेळी वाद्य पथकातील तरुण-तरुणींना केले.

इतर बातम्या-

Ranjitsinh Disale : मानसिक त्रास दिल्याचे,पैसे मागितल्याचे पुरावे द्या, सोलापूर जिल्हा परिषदेचे रणजितसिंह डिसले यांना पत्र

Nagpur Wedding | शुभमंगल सावधान होणार!, एवढ्यात बालसंरक्षण अधिकाऱ्यांची एन्ट्री, का झाला लग्नसमारंभ रद्द?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.