Aurangabad | वाळूजमध्ये पुन्हा राडा, कामगाराला कोयत्याने मारहाण आणि लूट

अनोळखी दोघांपैकी एकाने हातातील कोयत्यासारख्या लोखंडी हत्याराने डाव्या आणि उजव्या हातावर तसंच दोन्ही दंडावर वार केले. त्यानंतर मोबाइल आणि खिशातील पॉकेट काढून घेतले. त्यानंतर हे आरोपी फरार झाले. दर घटनेनंतर जखमी झालेल्या अभिषेक यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

Aurangabad | वाळूजमध्ये पुन्हा राडा, कामगाराला कोयत्याने मारहाण आणि लूट
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 5:27 PM

औरंगाबाद | औरंगाबादमधील गुन्हेगारीविषयक (Aurangabad crime) घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच वाळूजमध्ये दुर्लभ कश्यप गँगच्या गुंडांनी भर रस्त्यावर एका तरुणाला मारहाण केली होती. आता पुन्हा एकदा वाळूजमध्ये (Waluj MIDC) गुंडांनी धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. वाळूज एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कामावर जाणाऱ्या कामगाराला अडवून तीक्ष्ण हत्याराने वार करत लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कामगार (Company Worker) गंभीर जखमी झाला आहे. अभिषेक कैलास बडक असं या जखमी तरुणाचं नाव आहे. या प्ररकरणी अभिषेक या तरुणाने पोलिसात तक्रार दाखल केली असून वाळूज एमआयडीसी सदर गुंडांचा शोध घेत आहेत. औरंगाबाद आणि परिसरात दर काही दिवसांनी गुंडांनी मारहाण केल्याच्या घटना घडत असून पोलिसांचा या प्रकारांवर वचक नसल्याचे समोर येत आहे. भर रस्त्यावर नागरिकांना मारहाण, लुटीचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

कोयत्याने मारहाण आणि लूट

अभिषेक यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ते रांजणगाव येथून कंपनीत कामावर जात होते. मायलान कंपनीत ते काम करतात. याच वेळी रस्त्यात ही घटना घडली. लक्ष्मी कंपनीच्या गेटच्या समोरील रस्त्याच्या बाजूला अभिषेक पोहोचले असता, अचानक तेथे दोन अनोळखी लोक आले. अभिषेक यांच्याजवळ येऊन उभे राहिले. तुझ्या जवळ काय आहे, ते सगळे काढून दे, अशी धमकी या लोकांनी दिली. या प्रकाराला विरोध केल्यानंतर अनोळखी दोघांपैकी एकाने हातातील कोयत्यासारख्या लोखंडी हत्याराने डाव्या आणि उजव्या हातावर तसंच दोन्ही दंडावर वार केले. त्यानंतर मोबाइल आणि खिशातील पॉकेट काढून घेतले. त्यानंतर हे आरोपी फरार झाले. दर घटनेनंतर जखमी झालेल्या अभिषेक यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

गुंडगिरीचे वाढते प्रमाण गंभीर

औरंगाबाद शहर तसेच वाळूज एमआयडीसी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुंडगिरीचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. वाळूजमध्ये कामगाराला मारहाण केल्याच्या घटनेपूर्वी दोन दिवस आधीच दुर्लभ कश्यप गँगच्या गुंडांनी एका तरुणाला भर रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये अशा गुंडांची दहशत निर्माण होत आहे. शहरात दर काही दिवसांनी हाणामारी, जीवघेणा हल्ला, खूनाच्या घटना घडत असल्याने गुंडांवर पोलिसांचा वचक आहे की नाही, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

इतर बातम्या-

Prabhakar Sail : मुलगा गेला आता आता कसल्या चौकशा करता? प्रभाकर साईल यांच्या आईचा संतप्त सवाल

Nawab Malik : नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टात मागितली दाद; ईडीच्या कारवाईला दिले आव्हान

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.