Aurangabad Weather Update: शहरात आजही उकाडा कायम, 31 ऑगस्टला पाऊस बरसणार

| Updated on: Aug 29, 2021 | 1:10 PM

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ लागल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Aurangabad Weather Update: शहरात आजही उकाडा कायम, 31 ऑगस्टला पाऊस बरसणार
संग्रहित छायाचित्र
Follow us on

औरंगाबाद: राज्यात परतीच्या मान्सूनचे ढग दिसू लागताना, औरंगाबाद (Aurangabad Rain Forecast) आणि परिसरालाही अखेरच्या श्रावणसरींची प्रतीक्षा लागली आहे. मागील आठवड्यापासून उकाडा वाढला आहे. पण यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्मितीही तयार होत असल्याचे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे. आज शहराचे तापमान (temperature) किमान 23 अंश सेल्सियस ते कमाल तापमान 29 अंश सेल्सियस एवढे असेल. शहरातील एमजीएम येथील एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राच्या वेबसाईटनुसार, शहरातील तापमान 27.5 अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले. (Aurangabad weather forecast, rain update in Marathwada, Maharashtra)

आर्द्रतेचे प्रमाण 74 टक्क्यांवर

हवेतील पाण्याच्या थेंबाचा अंश मोजणे म्हणजे आर्द्रता होय. हे पाण्याचे थेंब एका अदृश्य वायूमध्ये रुपांतरीत होतात. त्यामुळे हवेत या पाण्याचे प्रत्यक्ष अस्तित्व दिसत नसले तरी त्याची जाणीव होत असते. औरंगाबादमधील आर्द्रता सध्या 74 टक्क्यांच्या आसपास असल्याने वातावरणातील उकाड्याचं प्रमाण काहीसं कमी झालं आहे. पुढील दोन दिवसातील उकाडाही आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

पावसाची प्रतीक्षा आणखी दोन दिवस

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ लागल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे परतीचा मान्सून राज्यातील नागरिकांना गारव्याचा अनुभव देण्याचा शक्यता आहे.

हवामान विभागाचा नेमका अंदाज?

बंगालच्या उपसागरात तयार होण्या-या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि त्याचा पश्चिम व मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यात येत्या 4,5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अधिक माहितीसाठी IMD वेबसाईट पाहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागानं आजच्या दिवसासाठी सिंधुदुर्ग , बीड, उस्मानाबाद, नांदेड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. तर 29 ऑगस्टला देखील रत्नागिरी ,सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, यवतमाळ वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

30 ऑगस्टला विविध जिल्ह्यांना ऑरेंज अ‌लर्ट

हवामान विभागानं सोमवारी परभणी जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर,रत्नागिरी, जळगाव, बुलडाणा, जालना, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

इतर बातम्याः 

National Sports day: औरंगाबादच्या मातीतला क्रिकेटर अमेरिकन संघात, सुशांतच्या क्रिकेट भरारीची खास कहाणी

Aurangabad Gold Rate: औरंगाबादेत सोने 48 हजार रुपयांपुढे, सणासुदीच्या मुहूर्तावर बाजारात उत्साह