Weather Update today : राज्यात येत्या पाच दिवसात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईत पाऊस सुरु

बंगालच्या उपसागरात तयार होण्यारे कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम आणि मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाच्या शक्यतेमुळे, महाराष्ट्रात येत्या 4,5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे, असं ट्विट हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी केलं आहे.

Weather Update today : राज्यात येत्या पाच दिवसात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईत पाऊस सुरु
Rain Update

मुंबई: राज्यात येत्या चार- पाच दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या अंदाजानंतर राज्यात पावसालाही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.  बंगालच्या उपसागरात तयार होण्यारे कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम आणि मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाच्या शक्यतेमुळे, महाराष्ट्रात येत्या 4,5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे, असं ट्विट हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी केलं आहे.

यंदाच्या मान्सूनच्या अनियमिततेमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी असून राज्यात आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीन राज्यात 4 ते 5 दिवसात मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागानं या पुढील पाच दिवसांचा अंदाज जारी केला आहे.

हवामान विभागाचा नेमका अंदाज?

बंगालच्या उपसागरात तयार होण्या-या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि त्याचा पश्चिम व मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यात येत्या 4,5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अधिक माहितीसाठी IMD वेबसाईट पाहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान विभागाकडून यलो अॅलर्ट जारी

भारतीय हवामान विभागानं आजच्या दिवसासाठी सिंधुदुर्ग , बीड, उस्मानाबाद, नांदेड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. तर 29 ऑगस्टला देखील रत्नागिरी ,सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, यवतमाळ वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

30 ऑगस्टला विविध जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट

हवामान विभागानं सोमवारी परभणी जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर,रत्नागिरी, जळगाव, बुलडाणा, जालना, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

31 ऑगस्टला रायगड, ठाणे आणि नाशिकला अ‌ॅलर्ट

मंगळवारी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, मुंबई, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर, 1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

इतर बातम्या:

अतिशहाण्याला कायद्याचा लगाम गरजेचा होता, तो मुख्यमंत्र्यांनी घातला, राणेंच्या अटकेवर सेनेची पहिली प्रतिक्रिया

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात, वर्षा गायकवाड यांची माहिती

Weather Update IMD predicts heavy rainfall during next four and five days at various places of Maharashtra

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI