प्रेमचा असाही अंत, आधी तिच्या पैशांवर कमाई अन् शेवटी जीव जाईपर्यंत मारहाण, काय घडलं औरंगाबादेत?

तिने कमावलेल्या पैशांवर आधी प्रियकराने मौजमजा केली आणि नंतर तिने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले. या वादातूनच प्रियकराने तिला बेदम मारहाण केली . यात ती गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

प्रेमचा असाही अंत, आधी तिच्या पैशांवर कमाई अन् शेवटी जीव जाईपर्यंत मारहाण, काय घडलं औरंगाबादेत?
सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 2:37 PM

औरंगाबादः शहरात 2 फेब्रुवारी रोजी बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या महिलेचा उपाचारादरम्यान मृत्यू (Woman Death) झाला होता. मात्र महिलेची अशी अवस्था कुणी केली, याचा तपास (Murder mystery) सुरु होता. पोलिसांच्या तपासात महिलेच्या प्रियकरानेच तिचा खून (Lover committed murder) केल्याचे स्पष्ट झाले. महिला आणि प्रियकर काही काळ एकत्र राहात होते. तिने कमावलेल्या पैशांवर आधी प्रियकराने मौजमजा केली आणि नंतर तिने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले. या वादातूनच प्रियकराने तिला बेदम मारहाण केली आणि यात ती गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुकुंदवाडी पोलिसांच्या तपासात हा खून असल्याचे उघड झाले. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कविता ऐलुरे ऊर्फ कविता सचिन वानखेडे ऊर्फ जान्हवी असे मृत महिलेचे नाव आहे. तर अजमत खान ऊर्फ कयामत अनिस खान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

काय घडली घटना?

मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 फेब्रुवारीला मध्यरात्री इच्छामणी हॉटेलजवळील मोकळ्या मैदानात एक अनोळखी महिला बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. मुकुंदवाडी पोलिसांनी या महिलेला घाटीत दाखल केले. घाटी रुग्णालयात उपचार सुरु असताना या महिलेचा 6 फेब्रुवारीला मृत्यू झाला. तोपर्यंत महिलेची ओळख पटली नव्हती. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा परिसरातील नागरिकांनी तिला ओळखले. अजमत खान हा महिलेसोबत रहात होता. त्याने खुनाच्या दिवशी महिलेला बेदम मारहाण केल्याची कबुलीही दिली.

प्रेयसीचा खून का केला?

या खुनाच्या तपासात पोलिसांनी आधी आरोपी अजमत खान याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता, अजमतने महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगितले. तसेच तीने पैसे न दिल्यामुळे जमिनीवर डोके आपटून गंभीर जखमी केल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी उपनिरीक्षक संदीप वाघ यांनी फिर्यादी होत अजमत खान याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास निरीक्षक ब्रह्मा गिरी करीत आहेत.

इतर बातम्या-

अखेर ‘ब्रह्मास्त्र’मधील आलियाचा फर्स्ट लूक आला समोर; वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली खास भेट

‘द काश्मीर फाईल्स हा चांगला चित्रपट, प्रत्येकानं पहावा’; मोदींकडून कौतुकाचा वर्षाव