ये बात है.. मंगळसूत्र हिसकावण्यासाठी चोराने गालात चापट मारली, पण त्याला काय माहित आपण कोणत्या महिलेशी पंगा घेतलाय..

| Updated on: Jan 17, 2022 | 1:03 PM

ज्या महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न चोराने केला, ती महिलाही डॅशिंग निघाली. तिच्या धाडसामुळे त्याचा हा प्रयत्न सपशेल फसला.

ये बात है.. मंगळसूत्र हिसकावण्यासाठी चोराने गालात चापट मारली, पण त्याला काय माहित आपण कोणत्या महिलेशी पंगा घेतलाय..
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकवासाठी बाहेर निघालेल्या महिलांचे दागिने पळवणारे चोर सक्रिय झाले आहेत. वाळूज एमआयडीसी परिसरात मकर संक्रांतीच्या दिवशी चार मंगळसूत्र चोरी झाल्याच्या घटना घडल्या. दुसऱ्या दिवशी शनिवारीदेखील एसटी कॉलनीत मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न झाला. पण ज्या महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न चोराने केला, ती महिलाही डॅशिंग निघाली. तिच्या धाडसामुळे त्याचा हा प्रयत्न सपशेल फसला.

काय घडलं नेमकं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजाजनगर येथील पुष्पा विजय निकम या अंगणात रात्री 10.30 वाजता मोबाइलवर बोलत होत्या. एक चोर धावत त्यांच्या दिशेने आला. अचानक पुष्पा यांच्या गालात चापट मारली. नंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करताच पुष्पा यांनी हिंमतीने चोरट्याचा शर्ट घट्ट पकडला. चोर-चोर असा आरडाओरडा सुरु केला. त्यांचा आवाज ऐकून नागरिक मदतीला धावले. जमलेल्या लोकांनी चोराला चांगलाच चोप दिला.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भारत राजू गडवे, असे या चोरट्याचे नाव असून नागरिकांनी त्याला धू धू धूतला आणि पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर सदर महिलेचे परिसरात कौतुक होत आहे. महिलांनी थोडी हिंमत दाखवली तर अशा प्रकारच्या घटना करण्याची चोरांची हिंमत होणार नाही, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

इतर बातम्या-

Video : ढील दे दे रे बंदर भैया… पतंगबाजीत माकडही नव्हतं मागे, संक्रांतीदिवशी छतावर चढत दिला शानदार परफॉर्मन्स

रोहित शर्मा होणार टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार, मात्र BCCI ची हिटमॅनसमोर महत्त्वाची अट