औरंगाबादध्ये ED चे छापेः व्यावसायिक पद्माकर मुळे यांच्याविरोधात कारवाई

| Updated on: Nov 11, 2021 | 7:34 PM

शहरात आज बड्या उद्योजकांविरोधार ईडीने (ED Raid) एकापाठोपाठ एक असे छापे टाकले आहेत. आतापर्यंत नेमक्या कोणत्या उद्योजकांवर (Aurangabad businessman) ही कारवाई सुरु आहे

औरंगाबादध्ये ED चे छापेः व्यावसायिक पद्माकर मुळे यांच्याविरोधात कारवाई
औरंगाबादमध्ये उद्योजकाच्या आस्थापनांवर ईडीचे छापे
Follow us on

औरंगाबादः शहरात आज बड्या उद्योजकांविरोधार ईडीने (ED Raid) एकापाठोपाठ एक असे छापे टाकले आहेत. आतापर्यंत नेमक्या कोणत्या उद्योजकांवर (Aurangabad businessman) ही कारवाई सुरु आहे, हे गोपनीय होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादचे बडे व्यावसायिक पद्माकर मुळे यांच्यावर ईडीची रेड पडल्याचा खुलासा झाला आहे. तसेच एनसीबीचे अधिकारी  समीर वानखेडे प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे गेल्यानंतर ही कारवाई झाल्याची चर्चा जोर धरत आहे.

कोण आहेत पद्माकर मुळे?

या प्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील बियाणे उत्पादक व्यावसायिकावर ही धाड पडली आहे. बियाणे उत्पादक व्यावसायिक पद्माकर मुळे असे त्यांचे नाव असून ते शहरातले सरकारी ठेकेदार आहेत. पद्माकर मुळे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार कुटुंबियांशी अगदी घनिष्ठ संबंध आहेत. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी मधुकर अण्णा मुळे यांचे हे बंधू आहेत. औरंगाबादमध्ये अजित सीड्स नावाने पद्माकर मुळे यांची कंपनी आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे विश्वस्थ असून त्यांच्या नावावर साखर कारखानादेखील आहे.

सात ठिकाणी धाडी, 54 अधिकाऱ्यांचा ताफा

वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या गैरव्यवहाराप्रकरणी मुंबई, पुणे, औरंगाबादसह सात ठिकाणी ईडीने या धाडी टाकल्या आहेत. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. वक्फ बोर्ड हा विभाग सध्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येतो. वक्फ बोर्डाच्या जमिनी भाडेतत्त्वावर देता येतात मात्र त्याची विक्री करता येत नाही. मात्र औरंगाबादमधील काही उद्योगपतींनी त्या इमारती भाडेतत्त्वार घेऊन त्यावर टोलेजंग इमारतीही बांधल्या आहेत. त्या इमारतीतील गाळे थेट रजिस्ट्री, खरेदीखत करून विकल्यादेखील आहेत. हा गैर व्यवहार शेकडो कोटींचा झाला होता. यासंदर्भातील तक्रारी ईडीकडे दाखल झाल्या होत्या. याविरोधात ईडीने तपाससत्र सुरु होतं. त्यानुसार औरंगाबादमध्येही ही धाड पडली आहे. या धाडींसाठी ईडीच्या 54 अधिकाऱ्यांचे पथक औरंगाबादमध्ये दाखल झाले असून व्यावसायिक आणि उद्योजकांची घरे व आस्थापनांवर छापे टाकले जात आहेत.

इतर बातम्या-

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं, सन्मानपूर्वक तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु, विजय वडेट्टीवारांचं आश्वासन

कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्या; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी, थेट राष्ट्रपतींना लिहिले पत्र

भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, राष्ट्रवादी जाब विचारणार; ईडी कार्यालयावर धडकणार