भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, राष्ट्रवादी जाब विचारणार; ईडी कार्यालयावर धडकणार

ईडीने राज्यभरात कारवाया सुरू केलेल्या असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने ईडीच्या कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेत्यांवर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांचं काय झालं?

भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, राष्ट्रवादी जाब विचारणार; ईडी कार्यालयावर धडकणार
नवाब मलिक
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 6:32 PM

मुंबई: ईडीने राज्यभरात कारवाया सुरू केलेल्या असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने ईडीच्या कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेत्यांवर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांचं काय झालं? भाजप नेत्यांची चौकशी का केली नाही? त्यांना कोर्टात का उभं केलं नाही? असा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीचं एक शिष्टमंडळ ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. पक्षाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. भाजपच्या अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली होती. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यावरील कारवाई थांबवण्यात आली होती. या सर्व प्रकरणाची माहिती राष्ट्रवादीकडून गोळा करण्यात आली आहे. ही संपूर्ण यादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मंत्री, नेते ईडीच्या कार्यालयात जाऊन देणार आहेत. तसेच भाजप नेत्यांवरील कारवाईला गती का देत नाही? हे तपास का थांबले आहेत? याची माहिती घेणार आहेत, असे मलिक यांनी सांगितलं. ईडीला सहकार्य करण्यासाठी सगळी माहिती गोळा झाली आहे. ज्यांच्यावर तक्रारी दाखल आहेत, त्या गतीमान करा असे आवाहनही ईडी अधिकार्‍यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भानुशाली फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काय करत होता?

दरम्यान, गुजरातमध्ये पकडण्यात आलेल्या ड्रग्जवरूनही त्यांनी भाजपला घेरलं. समुद्रमार्गे गुजरातमधून देशभरात ड्रग्जचा व्यापार चालतोय हे आता सिद्ध होतेय. त्यामुळे याच्यामागे कोण आहे याचा खुलासा एनसीबी आणि एनआयए यांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली. काल गुजरातच्या द्वारका येथे 350 कोटीचे ड्रग्ज सापडले होते. त्याआधी मुंद्रा एअरपोर्टवर तीन टन ड्रग्ज सापडले होते. त्याची किंमत 27 हजार कोटी रुपये होती. या ड्रग्जच्या खेळात मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी, सुनिल पाटील हे किरीट सिंग राणा यांच्याकडे वारंवार का जात आहेत? हे सगळे गुजरातच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कशासाठी राहत आहेत?, असे सवालही त्यांनी केले.

सत्य शोधणे ही एनसीबीची जबाबदारी

मुंद्रा एअरपोर्टवरील ड्रग्ज प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात आले आहे. आता द्वारका येथे 350 कोटीचे ड्रग्ज सापडल्यानंतर यातून सत्यबाहेर काढण्याची एनसीबीची जबाबदारी आहे. या देशातून अमली पदार्थाचा व्यापार नेस्तनाबूत करण्यासाठी 1985 मध्ये कायदा करण्यात आला होता. त्याची अमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कितीही मोठा माणूस असू द्या, कारवाई करा

मुंबईत दोन – चार ग्रॅम ड्रग्ज पकडून बॉलिवूडला बदनाम करुन प्रसिद्धी करण्यात येत आहे. पण गुजरातमध्ये तर समुद्रमार्गे ड्रग्ज येत आहेत. मनिष भानुशाली, धवल भानुशाली व त्यांचे इतर सहकारी गुजरातमधून हे ड्रग्जचं रॅकेट सांभाळत आहेत. त्यामुळे या तपासाचा छडा एनसीबी व एनआयए यांनी लावावा. मग यामध्ये कोण कितीही मोठा असो, मंत्री असो किंवा कार्यकर्ता हे न पाहता ड्रग्जच्या खेळाला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

वक्फ बोर्डात मी क्लिन अप मोहीम राबवली, ईडीच्या चौकशीचं स्वागत, बातम्या पेरल्या तरी लढा थांबणार नाही: नवाब मलिक

Kangana Ranaut: ‘या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?’, भाजप खासदार वरुण गांधींची कंगनावर जोरदार टीका

VIDEO: संजय राऊतांना बॉर्नविटा पिण्याची गरज; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.