Electricity Theft: वीज चोरीची पद्धत पाहून महावितरणही चक्रावले, औरंगाबादच्या नारेगावात काय घडले?

| Updated on: Dec 22, 2021 | 11:15 AM

औरंगाबादमधील एका कारखान्यात टाचणीच्या मदतीने वीज चोरी होत असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. चोरी करण्याचा सगळा प्रकार पाहून महावितरणचे कर्मचारीही थक्क झाले.

Electricity Theft: वीज चोरीची पद्धत पाहून महावितरणही चक्रावले, औरंगाबादच्या नारेगावात काय घडले?
औरंगाबादच्या कारखान्यात वीज चोरी उघड
Follow us on

औरंगाबादः निरनिराळ्य़ा शक्कल लढवून पळणारे वीजेचे मीटर थांबवण्याचे अनेक प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत. औरंगाबादेतही आणखी एक प्रकार नुकताच उघडकीस आला. कारखान्यातील वीजेचे मीटर बंद करण्यासाठी लढवलेली ही शक्कल पाहून महावितरणचे (MSEDCL) कर्मचारीही चक्रावले. या चोरीद्वारे त्यांनी चक्क तीन लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे.

नारेगावमधील कारखान्यात चोरी

नारेगाव येथील सिसोदिया इंडस्ट्रियल इस्टेटमधील हिलाबी इंजिनिअरिंग वर्क्स या कारखान्यात हा गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. या कारखान्यात प्लास्टिकच्या बॉटल तयार केल्या जातात. 17 ऑगस्ट रोजी महावितरणच्या चिकलठाणा एमआयडीसी शाखेचे प्रधान तंत्रज्ञ सतीश दिवे हे वीज बिल वसुलीसाठी या कारखान्यात गेले. त्यांनी मीटरची पाहणी केली असता तेव्हा वीजवापर सुरु होता, मात्र मीटरमधील डिस्प्ले गायब होता. दिवे यांनी सहाय्यक अभियंता श्याम मोरे यांना याविषयी माहिती दिली. मोरे यांनी पथक आणि पंचासह मीटरची बारकाईने पाहणी केली. तेव्हा टाचणीच्या मदतीने ही वीजचोरी केल्याचे उघडकीस आले.

चोरीसाठी फक्त एक टाचणी वापरली

कारखान्यात मीटरचा डिस्प्ले गायब करण्यासाठी म्हणजेच वीजचोरी करण्यासाठी अनोखी शक्कल वापरली गेली. मीटरच्या स्क्रोल बटणात टाचणी खोचून ठेवण्यात आली होती. महावितरणने कारवाई करत मीटरची प्रयोगशाळेत तपासणी केली असता, त्यातही फेरफार झाल्याचे उघडकीस आले. महावितरणने हनुमान मुंडे यांना 25 हजार 200 युनिटची वीजचोरी केल्याचे 2 लाख 99 हजार रुपयांचे वीज बिल दिले. हे बिल न भरल्यामुळे सिडको पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंदवण्यात आला.

इतर बातम्या-

Sanjay Sanap: आरोग्य भरतीचे पेपर मंगल कार्यालयात वाटले, विद्यार्थ्यामागं 1 ते दीड लाख, संजय सानपच्या राजकीय कनेक्शनमुळं खळबळ

TET Exam: परीक्षा घोटाळ्यातील सुखदेव डेरेंची औरंगाबादेतील कारकीर्दही कलंकीतच! नियमबाह्य पदमान्यतांचा ठपका