औरंगाबादेत जिओ कंपनीचा एरिया मॅनेजर असल्याचे सांगून फसवणूक, सायबर पोलिसांच्या जाळ्यात सापडला

| Updated on: Oct 02, 2021 | 1:31 PM

फिर्यादिनुसार, समीर खान याने 'मी जिओ कंपनीचा एरिया मॅनेजर आहे, ' अशी बतावणी करून गिगा फायबर प्लॅन देण्यासाठी 4 हजार 850 रुपये उकळले. त्यानंतर त्याने प्लॅन काही दिला नाही.

औरंगाबादेत जिओ कंपनीचा एरिया मॅनेजर असल्याचे सांगून फसवणूक, सायबर पोलिसांच्या जाळ्यात सापडला
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

औरंगाबाद: शहरातील विविध भागात राहणाऱ्या नागरिकांना जिओ कंपनीचा अधिकाऱी असल्याचे सांगून फसवणाऱ्या ठगाला औरंगाबादमधील सायबर पोलिसांनी (Cyber Police, Aurangabad) अटक केली आहे. जिओ कंपनीचा विशेष प्लॅन तुम्हाला द्यायचा असल्याचे सांगत त्याने नागरिकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. शहरातील छावणी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले असून अशी खोटी बतावणी करून त्यानी अजून किती जणांना गंडा घातला आहे, याविषयी तपास केला जात आहे.

प्लॅनसाठी घेतले 4,850 रुपये

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर खान मुक्त्यार खान (25, इंदिनागर, बायजीपुरा) असे आरोपीचे नाव आहे. घाटीतील सेवानिवृत्त दयानंद निमाले (रा. आकांक्षा विहार, नंदनवन कॉलनी) यांनी छावणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. फिर्यादिनुसार, समीर खान याने ‘मी जिओ कंपनीचा एरिया मॅनेजर आहे, ‘ अशी बतावणी करून गिगा फायबर प्लॅन देण्यासाठी 4 हजार 850 रुपये उकळले. त्यानंतर त्याने प्लॅन काही दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निमाले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणात सायबर अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत पोलिसांच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच छावणीचे निरीक्षक शरद इंगळे पुढील तपास करीत आहेत.

रेल्वे पोलिसात गोंधळ घालणाऱ्या दोघांना कारावास

दरम्यान शहरातील रेल्वे पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दोन आरोपींना एक वर्ष कारावास आणि प्रत्येकी साडे तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 17 मे 2019 रोजी रेल्वेस्थानकावर आरोपी सोमनाथ ऊर्फ लच्छा बाळासाहेब सावंत आणि आरोपी अनिल विठ्ठल गढवे हे गळ्यात जाड केबल घालून फिरताना दिसले. याबाबत औरंगाबाद लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार श्यामसुंदर नामदेव ढवळे यांनी हटकले व पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली असता मी 30 वर्षांपासून रेल्वे स्टेशनवर फिरतो, मला ओळखत नाही का, असे म्हणत पोलिसांना धक्काबुक्की केली होती. या प्रकरणी शुक्रवारी या दोन्ही आरोपींना सत्र न्यायालयात एक वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी साडे तीन हजार रुपये दंड ठोठावला आहे.

इतर बातम्या-

Aurangabad Gold: सोन्यानं झटकली मरगळ, दरात काहीशी वाढ, वाचा औरंगाबादचे दर काय?

Aurngabad Rain: औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याचा संपर्क तुटला, तिडका नदीला पूर, पाचोऱ्याला जोडणारा राज्यमार्ग बंद