सोन्याचे भाव कालपासून स्थिर, खरेदी करण्याची खास संधी, वाचा औरंगाबादचे भाव

औरंगाबादच्या सराफा बाजारात आज 28 ऑक्टोबर रोजी गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सोन्याचे भाव 47,800 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,600 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले.

सोन्याचे भाव कालपासून स्थिर, खरेदी करण्याची खास संधी, वाचा औरंगाबादचे भाव
प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबादः आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींनुसार देशात तसेच स्थानिक पातळीवर सोन्याच्या (Gold Price) भावांत चढ-उतार होत असतो. तसेच देशांतर्गत उलाढालींचा परिणामही सोन्याच्या दरांवर होतो. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने सोन्याच्या दागिने खरेदीचे प्रमाण वाढले आहे. तसेच इतर औद्योगिक क्षेत्रातील सोने (Gold use in Industry) खरेदीचे प्रमाणही वाढलेले असते. त्यामुळे दसऱ्यानंतर सोन्याचे भाव वाढीकडे झुकलेले दिसून येत आहेत. दिवळीनंतर हे भाव आणखी वाढणार असल्याचे संकेत जाणकारांनी दिले आहेत. दरम्यान औरंगाबादमध्ये कालपासून सोन्याचे तसेच चांदीचेही भाव स्थिर असल्याचे दिसून आले आहे.

औरंगबाादमध्ये आजचे भाव

औरंगाबादच्या सराफा बाजारात आज 28 ऑक्टोबर रोजी गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सोन्याचे भाव 47,800 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,600 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. मंगळवारी औरंगाबादमधील 22 कॅरेट सोन्याचे दर 48,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 49,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवण्यात आले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 68,800 रुपये एवढे नोंदले गेले. 25 ऑक्टोबर रोजी सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 49,200 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 48,050 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. अर्थात शेअर बाजारातील चढ-उतारानुसार दर काही मिनिटांनी सोन्याच्या भावात चढ-उतार दिसत असतो. येथे दिलेले भाव हे त्या वेळेनुसार सरासरी काढून दिलेले आहेत.

लक्ष्मीपूजनासाठी सोन्या-चांदीचे शिक्के

दिवाळीदरम्यान येणाऱ्या लक्ष्मीपूजनाला प्रत्येक घरात किंवा व्यावसायिक दुकानांमध्ये लक्ष्मीची पूजा अग्रक्रमाने केली जाते. बाजारपेठांमधील मोठ्या दुकानांमध्ये यावेळी धनरुपी लक्ष्मीची पूजा केली जाते. यासाठी लहान-मोठे व्यावसायिक दिवाळीपूर्वीपासूनच किंवा विशेषतः धनत्रयोदशीसाठी सोन्या-चांदीचे शिक्के खरेदी करतात. सध्या औरंगाबादच्या बाजारात अशा शिक्क्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याची माहिती औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली. सोन्याच्या शिक्क्यांची किंमत 400 रुपयांपासून ते 8000 रुपयांपर्यंत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच गणपती आणि लक्ष्मीच्या प्रतिमा असलेल्या चांदीच्या फ्रेमही बाजारात दाखल झाल्या आहेत.

लग्नसराईसाठी महिलावर्गाची लगबग

दिवाळीनंतर तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराई सुरु होते. ज्यांच्या घरात लग्न ठरलेली आहेत, ते आतापासूनच सराफ्यांकडे आपल्या पसंतीचे दागिने करायला टाकत असतात. अशा ग्राहकांचीही संख्या सध्या बाजारात वाढलेली दिसत आहे. दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, नेकलेस खरेदी जास्त होते. तसेच सध्या टेंपल ज्वेलरीलाही महिला जास्त पसंती देत आहेत.

सोन्याची शुद्धता कशी तपासता येईल?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.

इतर बातम्या-

स्मार्ट सिटी औरंगाबादचे काम आता ऑनलाइन, नोव्हेंबर अखेरपर्यंत मनपाच्या विविध सेवा डिजिटल स्वरुपात 

15 नोव्हेंबरपासून शासकीय कार्यालयात नो लस नो एंट्री, औरंगाबाद जिल्हा प्रशासनाचा इशारा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI