Aurangabad Jobs: ग्रीव्हज कॉटन कंपनी औरंगाबादेत उभारणार इंजिन निर्मितीचे हब, शहरात रोजगार वाढीची संधी

| Updated on: Sep 11, 2021 | 10:44 AM

चिकलठाणा व शेंद्रा एमआयडीसी येथील आधीच्या प्रकल्पांत एकूण 2000 जणांना रोजगार मिळाला आहे. कंपनीचा औरंगाबादेत नवीन प्रकल्प उभा राहिल्यावर रोजगारात आणखी वाढ होईल.

Aurangabad Jobs: ग्रीव्हज कॉटन कंपनी औरंगाबादेत उभारणार इंजिन निर्मितीचे हब, शहरात रोजगार वाढीची संधी
Follow us on

औरंगाबाद: ई- व्हेईकलमध्ये आघाडीचे नाव असलेली ग्रीव्हज कॉटन लिमिटेड (Greaves Cotton Limited ) ही कंपनी लवकरच इंजिन निर्मितीचा प्रकल्प औरंगाबादमध्ये विस्तारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंपनीचे चिकलठाण्यात (Chikalthana MIDC, Aurangabad) दोन आणि शेंद्रा एमआयडीसीमध्ये आधीपासूनच एक प्रकल्प आहे. त्याअंतर्गत अनेकांना रोजगार मिळालेला आहे. आतचा नवीन प्रकल्प सुरु झाल्यावर औरंगाबादमधील नागरिकांना नोकरी आणि रोजगारात आणखी वृद्धी होण्याचे संकेत आहे.

ग्रीव्हज कॉटन कंपनी कशाचे उत्पादन करते?

1859 मध्ये स्थापन झालेल्या ग्रीव्हज कॉटन कंपनीचे मुख्यालय मुबई येथे आहे. जेम्स ग्रीव्हज आणि जॉर्ज कॉटन यांनी सुरु केलेली ही कंपनी वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल इंजिन (ऑटोमोटिव्ह इंजिन), जेनसेट, पंपसेट तसेच शेती व बांधकामासाठी लागणारी उपकरणे तयार करते. या कंपनीचे पुणे, औरंगाबाद, नोयडा, कोइम्बतूर व चेन्नईच्या रानीपेट येथे प्रकल्प आहे. औरंगाबादच्या चिकलठाणा व शेंद्रा एमआयडीसीतील प्रकल्पात ऑटोमोटिव्ह इंजिनची निर्मिती होते.
मोबिलिटी सेगमेंटमध्ये ही कंपनी दरवर्षी 4 लाखांपेक्षा जास्त इंजिन तयार करते. कंपनीच्या प्रकल्पाअंतर्गत प्रतिमिनिट एक इंजिन तयार होते. भारतातील बहुसंख्य लोकांना TCO मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करते. यातून दररोज एक कोटीपेक्षा अधिक प्रवासी व 5 लाख टन मालाची वाहतूक केली जाते.

अँपियर इलेक्ट्रिक अंतर्गत औरंगाबादचा विस्तार

सध्या कंपनीने इलेक्ट्रिक व्हेइकलच्या निर्मितीत विशेष लक्ष घातले असून त्यासाठी ‘अँपियर इलेक्ट्रिक’ ही उपकंपनी सुरु केली आहे. या कंपनीनेच ई-स्कूटर बाजारात आणल्या आहेत. ई व्हेईकल निर्मितीचा प्रकल्प तमिळनाडूतील रानीपेट येथे सुरु केला जाणार आहे. त्या प्रकल्पाकरिता तसेच इतर शहरातील इंजिन निर्मिती प्रकल्प औरंगाबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कंपनीचे शहरात आधीच तीन प्रकल्प

ग्रीव्हज कॉटन लिमिटेड कंपनीचे चिकलठाणा एमआयडीसीत 30 एकर जागेवर 2 प्लांट आणि एक संशोधन व विकास प्रकल्प आहे. शेंद्रा एमआयडीसीत 17 एकरवर एक प्लांट आणि एक संशोधन प्रकल्प आहे. दोन्ही प्रकल्पांत मिळून 2000 जणांना रोजगार मिळाला आहे. कंपनीचा औरंगाबादेत नवीन प्रकल्प उभा राहिल्यावर रोजगारात आणखी वाढ होईल. जास्तीत जास्त स्थानिक मनुष्यबळाला संधी दिली जाईल. (Greaves Cotton Limited will start new plant in Aurangabad, Maharashtra)

इतर बातम्या- 

Bank Jobs 2021: साऊथ इंडियन बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदावर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेत नोकऱ्यांची अमाप संधी, भारतात 10 हजार तंत्रज्ञांची गरज, 75 लाखांपर्यंतची सॅलरी पॅकेजेस