शाळेचे नाव प्रतिभाताई पाटील; अन् शाळेतील पालकसभेतच शिक्षकाची मुख्याध्यापिकेला शिवीगाळ; महिला आयोगाने दखल घेण्याची मागणी

शाळेच्या प्रांगणात जाऊन गोंधळही घातला होता. शिक्षक देवेंद्र पाटील यांनी वैजयंता मिसाळ आणि त्यांच्या मुलीला धमकी देत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मुख्याध्यापिका आणि त्यांच्या मुलीला शाळेत पाय ठेऊ देणार नाही, अशीही धम देत भरसभेच शिवीगाळ केली.

शाळेचे नाव प्रतिभाताई पाटील; अन् शाळेतील पालकसभेतच शिक्षकाची मुख्याध्यापिकेला शिवीगाळ; महिला आयोगाने दखल घेण्याची मागणी
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 25, 2022 | 3:54 PM

औरंगाबाद: शहरातील हर्सूल टी पॉइंट (Hersul T Point Aurangabad) येथील प्रतिभाताई पाटील प्राथमिक शाळेत (Pratibhatai Patil Primary School) शिक्षकाने मुख्याध्यापिका आणि त्यांच्या शिक्षक मुलीला भर पालकसभेत शिवीगाळ (Abuse the teacher) केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.23) घडला आहे. याप्रकरणी शिक्षिका सुनंदा लक्ष्मण मिसाळ (वय 31) यांच्या तक्रारीवरून शिक्षक देवेंद्र राजेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला आयोगाने दखल घेण्याची मागणी मुख्याध्यापिका आणि त्यांच्या मुलीने केली आहे.

नेमकं काय प्रकरण

शिक्षिका सुनंदा लक्ष्मण मिसाळ यांच्या तक्रारीनुसार, वैजयंता लक्ष्मण मिसाळ या प्रतिभाताई पाटील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आणि त्याच संस्थेच्या सचिव आहेत. वैजयंता मिसाळ यांची मुलगी सुनंदा मिसाळ यादेखील त्याच शाळेत शिक्षिका आहे. शनिवार, 23 तारखेला मुख्याध्यापिका वैजयंता मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पालकसभा चालू असताना शिक्षक देवेंद्र राजेंद्र पाटील यांनी मुख्याध्यापिका आणि त्यांच्या शिक्षक मुलीला माईकवर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

जीवे मारण्याची धमकी

शाळेच्या प्रांगणात जाऊन गोंधळही घातला होता. शिक्षक देवेंद्र पाटील यांनी वैजयंता मिसाळ आणि त्यांच्या मुलीला धमकी देत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मुख्याध्यापिका आणि त्यांच्या मुलीला शाळेत पाय ठेऊ देणार नाही, अशीही धम देत भरसभेच शिवीगाळ केली. अशी तक्रार आता सुनंदा मिसाळ यांनी पोलिसात दिली आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये शिक्षिका सुनंदा मिसाळ यांच्या तक्रारीवरून शिक्षक देवेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

संस्था कुणाची?

प्रतिभाताई पाटील शिक्षक प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील हे होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा लहाना मुलगा निलेश पाटील संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहे. तर याच संस्थेत राजेंद्र पाटील यांचे तीन मुलं आणि तीन सुनादेखील नोकरी करतात. दरम्यान, शाळेच्या निर्मितीपासून संस्थेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका वैजयंता मिसाळ या कामकाज पाहतात, अशी माहिती मुख्याध्यापिका वैजयंता मिसाळ यांनी दिली आहे.