शेतकऱ्यांनो नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत दाखल करा, नुकसानभरपाईसाठी कुठे आणि कशी कराल तक्रार, जाणून घ्या

| Updated on: Sep 09, 2021 | 9:24 PM

स्थानिक आपत्ती अंतर्गत पीक विमा कंपनीकडे (एचडीएफसी एर्गो) नुकसान भरपाई मिळण्यासाठी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत तक्रार करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नुकसान कळविताना सर्व्हे नंबरनिहाय नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळविणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनो नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत दाखल करा, नुकसानभरपाईसाठी कुठे आणि कशी कराल तक्रार, जाणून घ्या
07 सप्टेंबर रोजीच्या पावसाने औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
Follow us on

औरंगाबाद: जिल्ह्यात 7 सप्टेंबर रोजी अनेक महसुल मंडळात अविवृष्टी (Heavy Rainfall in  all Aurangabad revenue circle) झाली. मोठ्या पावासामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने आणि नदी नाल्याला पूर आले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांनी स्थानिक आपत्ती अंतर्गत पीक विमा कंपनीकडे (एचडीएफसी एर्गो HDFC Ergo) नुकसान भरपाई मिळण्यासाठी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत तक्रार करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नुकसान कळविताना सर्व्हे नंबरनिहाय नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळविणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan, Aurangabad District Collector) यांनी केले आहे.

72 तासांत तक्रार आवश्यक

जिल्हाधिकारी म्हणाले की, ज्या शेतकरी व्यक्तींनी खरिप हंगाम 2021 मध्ये विम्याचे हफ्ते भरले आहेत त्या शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणी पश्चात नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत विमा कंपनीला कळविणे आवश्यक आहे.

नुकसानीची माहिती कोण-कोणत्या पद्धतींनी देणार?

  1.  केंद्र शासनाच्या Crop Insurance ॲपव्दारे ही माहिती भरता येईल. हे अॅप पुढील लिंकवर मिळेल. Crop Insurance- https#//play.google.com/store/apps/details ? id=in.farmguide.farmerapp.central&hI=en_IN&gl=US
    ( ॲप फोनमध्ये Install करुन समोर येणाऱ्या सूचनांद्वारे आपली योग्य माहिती भरावी.)
  2.  HDFC Ergo कंपनीच्या टोल फ्री क्रमांक 1800 2660 700 क्रमांकावर फोन करुन कळविता येईल.
  3. कृषी विभागांच्या अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर करता येईल. अर्ज सादर करताना खलील माहिती अवश्यभरावी- नाव, मोबाईल क्रमांक, अधिसूचित मंडळ, बँकेचे नाव, आपत्तीच प्रकार, बाधित पीक, विमा भरल्याची पावती इत्यादी \
  4. एचडीएफसी एर्गो वेबसाईटवर वेबलिंकव्दारे स्थानिक आपत्तीची माहिती दयावी. यासाठीची लिंक पुढीलप्रमाणे- https://customersupport.hdfcergo.com/selfhelp/RABG_Claim.aspx अधिक माहितीसाठी Email: pmfby.maharashtra@hdfcergo.com
  5. याचप्रकारे पीक नुसानानीचा पंचनामा करणारी समिती, विमा कंपनी (HDFC Ergo) प्रतिनिधी, स्थानिक कृषी सहाय्यक अधिकार, स्थानिक तलाठी यांच्याकडेही शेतकऱ्यांना नुकसानीची तक्रार करता येईल.

इतर बातम्या- 

राज्यात पीकविमा कंपन्यांची चंगळ, तब्बल 10 हजार कोंटीहून अधिकचा नफा

कन्नड, चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळं शेतीचं मोठं नुकसान, हर्षवर्धन जाधवांचा आंदोलनाचा इशारा