शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, खरिपातील मुख्य पिकाला 10 हजारांचा भाव

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 06, 2021 | 3:39 PM

यंदा खरीपातील पेरण्या लांबल्या होत्या. त्यामुळे सध्या सोयाबीनची आवक घटलेली आहे. परिणामी सोयाबानचे दरात वाढ झाली असून हेच दर कायम रहावेत अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.यंदा राज्यात सोयाबीनचा पेरा वाढलेला होता. त्यामुळे उत्पादन वाढेल असा आशावाद शेतकऱ्यांनाही होता.

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, खरिपातील मुख्य पिकाला 10 हजारांचा भाव
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती
Follow us

लातूर : आगामी काळात होणाऱ्या साोयापेंडच्या आयातीचा परिणाम सोयाबीनच्या (Soyabin) दरावर होणार असल्याचा अंदाज वर्तिवला जात होता. मात्र, अशा स्थितीमध्येही सोयाबीनचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा खरिपातील (Kharif) पेरण्या लांबल्या होत्या. त्यामुळे सध्या बाजारात सोयाबीनची आवक घटलेली आहे. परिणामी सोयाबानचे दरात वाढ झाली असून हेच दर कायम रहावेत अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. यंदा राज्यात सोयाबीनचा पेरा वाढलेला होता. त्यामुळे उत्पादन वाढेल असा आशावाद शेतकऱ्यांनाही होता. परंतू, मध्यंतरी (Rain) पावसाने दिलेली ओढ आणि किडीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. पण आता दर वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. ऑगस्ट माहिन्यात केंद्र सरकारने सोयापेंडच्या आयातीस परवानगी दिली होती. (Farmer) मात्र, देशांतर्गतच्या बाजारात तुटवडा आणि लांबलेला हंगाम यामुळे सोयाबीनचे दर वाढले आहेत. 1 ऑक्टोंबरपासून सोयाबीन हे बाजारपेठेत दाखल होत असते. यंदा मात्र, उशिराने पेरणी झाली होती त्यामुळे आता आवकही उशिराने होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सध्या 2 ते 3 लाख टनच सोयाबीन शिल्लक आहे. इतर राज्यात सोयाबीनची आवक काही प्रमाणात सुरु झाली आहे. त्यामुळे आगामी काळात दरामध्ये चढउतार हा ठरलेला असला तरी पहिल्या पेऱ्यातील सोयाबीन बाजारात दाखल होताच त्याला चांगला दर मिळेल असा आशावाद आहे. (Good news for farmers, the main crop soyabin is priced at Rs 10,000)

बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण

सोयापेंडची 12 लाख क्विंटल आवक करण्याचा निर्णय घेतला आहे. काही काळात प्रत्यक्ष आयात करण्यास सुरवातही होईल. मात्र, यापुर्वीच देशांतर्गत बाजारपेठेत आवक कमी होत असल्याने दर वाढले आहेत. दरात 500 ते 700 रुपयांची वाढ झाल्याने सोयाबीन आता 10 हजारपर्यंत गेले आहे. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी असेच दर रहावेत अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सोयापेंडचेही भाव वाढले

सोयाबीन तेजीत असल्याने आता सोयापेंडचेही दर वाढत आहेत. गेल्या आठवड्यात कमी पुरवठा झाल्याने सोयापेंडच्या दरात 3 ते 4 हजाराने वाढ झाली आहे. मध्यप्रदेशमध्ये सोयापेंडचे दर 85 हजार ते 87 हजारांनृवर पोहचले आहेत. महाराष्ट्रात 88 हजार तर राजस्थानमध्ये 90 हजारावर सोयापेंडचे दर गेले आहेत

सोयाबीन 10 हजारांवर

गेल्या वर्षभरात सोयाबीनच्या दरात चढ-उतार राहिलेला आहे. गतवर्षी पावसामुळे सोयाबीनचा खलावला होता. शिवाय आवकही वाढली होती. त्यामुळे सोयाबीनचे दर 6 हजारांवर आले होते. यंदाही अनियमित पाऊस आणि कीडीचा प्रादुर्भाव यामुळे दर घटतील असे चित्र निर्माण झाले होते शिवाय मोठ्या प्रमाणात सोयापेंडची आवक केली जाणकर असल्याने चितेंचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू, ओढावलेल्या परस्थितीमुळे सध्या बाजारपेठेतील वातावरण हे सकारात्मक आहे. (Good news for farmers, the main crop soyabin is priced at Rs 10,000)

इतर संबंधित बातम्या :

VIDEO: ‘अचानक गाय खाली पडते आणि अवघ्या 2 मिनिटात मृत्यू’, भिवंडीत शेतकऱ्याच्या 15 गायींच्या मृत्यूनं खळबळ

अमेरिकन लष्करी अळीचा मक्यावर प्रादुर्भाव, महागडी औषधं फवारणीनंतरही रिझल्ट नाहीच, शेतकरी मेटाकुटीला

सांगा शेती करायची कशी? आवक असली तर भाव नाही अन् भाव असला तर माल नाही

(Good news for farmers, the main crop soyabin is priced at Rs 10,000)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI