सांगा शेती करायची कशी? आवक असली तर भाव नाही अन् भाव असला तर माल नाही

कधी नैसर्गिक संकट तर कधी बाजारपेठेतील (Market) चढउतार यामुळे शेतकरी (Farmer) कायम अडचणीत राहिलेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी कोरोनाचा सामना करीत आहे. हे कमी म्हणून की काय आता भाजीपाल्याचे गडगडलेले दर यामुळे दुष्काळात तेरावा अशीच शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. निफाड (Nifad) बाजारपेठेत शनिवारच्या बाजारात दर कोसळल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

सांगा शेती करायची कशी? आवक असली तर भाव नाही अन् भाव असला तर माल नाही
बहुतेक शाकाहारी लोक करतात या 8 चुका आणि शरीराचा नाश करतात

लातूर : कधी नैसर्गिक संकट तर कधी बाजारपेठेतील (Market) चढउतार यामुळे शेतकरी (Farmer) कायम अडचणीत राहिलेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी कोरोनाचा सामना करीत आहे. हे कमी म्हणून की काय आता भाजीपाल्याचे गडगडलेले दर यामुळे दुष्काळात तेरावा अशीच शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. निफाड (Nifad) बाजारपेठेत शनिवारच्या बाजारात दर कोसळल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. (Vegetable prices fall, farmers’ problems persist, If there is an inflow, there is no price)
कोराना संकटाचा सामना करीत यंदा पोषक वातावरणामुळे निफाड तालुक्यातील अत्याधुनिक पद्धतीचा स्वीकार करीत भाजीपाला खरा परंतू, बाजारभावातील घसरण यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. आर्थिक कोंडी असतानाही शेतकऱ्यांनी या परीसरातील भाजीपाल्याची लागवड केली होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत आहेत. टोमॅटो, सिमला, वांगे, कोबी, फ्लॅावर, कोथिंबीर, शेपू, मेथी, काकडी, कारले सर्वकाही बेभाव जात आहे. भाजीपाल्याची लाबवड केल्यापासून बाजारात दाखल होईपर्यंत लाखोंचा खर्च करुनही पदरी निराशा पडत असल्याने शेती करावी कशी असा प्रश्न आता शेतकरी व्यक्त करीत आहेत. (Vegetable prices fall, farmers’ problems persist, If there is an inflow, there is no price)

वावरातली ढोबळी मिरची बांधावर

शेती हा बेभरवश्याचा व्यवसाय झाला आहे. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारातील चढऊतार यामुळे शेतामध्ये केलेला खर्चही पदरी पडत नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून दर घसरल्याने बाजारात घेऊन जाणेही परवडत नाही त्यामुळे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर बांधावरच ढोबळी मिरची काढून टाकली आहे. मिरची वावरातून बाहेर काढत इतर पिकासाठी शेत रिकामे केले जात आहे. झालेल्या खर्चाचा विचार न करता भाजीपाल्याचे शेत रिकामे केले जात आहे.

प्रतिकूल परिस्थितीमुळे जगणेही मुश्किल

शेतामध्ये नवनविन प्रयोग शेतकरी राबवत आहेत. परंतू, निसर्गाची साथ मिळत नाही. लाखो रुपये खर्ची करूही उत्पादनावरील खर्चही निघत नाही. परिणामी परिसरातील शेतकरी हे कर्जबाजारी होत आहेत. घरातील इतर सदस्यांचे हातचे काम गेले आहे तर शेती हा नुकसानीचा व्यवसाय ठरत आहे.

भाजीपालाच नाही तर सर्वकाही कवडीमोल

भाजीपाल्याप्रमाणेच इतर मुख्य पीकांही अवस्था आहे. उडीद, मूग, सोयाबीनलाही अद्यापपर्यंत समाधानकारक दर मिळालेले नाहीत. यातच पावसामुळे पीकाचा दर्जाही ढासळलेला आहे. उडीद काढणीच्या प्रसंगीच पावसाने हजेरी लावली असून पीके ही पाण्यात आहेत. ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकऱ्यांची ही कायम आहे. (Vegetable prices fall, farmers’ problems persist, If there is an inflow, there is no price)

इतर संबंधित बातम्या :

VIDEO: ‘अचानक गाय खाली पडते आणि अवघ्या 2 मिनिटात मृत्यू’, भिवंडीत शेतकऱ्याच्या 15 गायींच्या मृत्यूनं खळबळ

अमेरिकन लष्करी अळीचा मक्यावर प्रादुर्भाव, महागडी औषधं फवारणीनंतरही रिझल्ट नाहीच, शेतकरी मेटाकुटीला

Weather Update : राज्यात पुढील 4 दिवसात कोकण मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार, मुंबईसह ठाणे पालघरमध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI