इम्तियाज जलील हे पीएफआयचे सहानुभूतीदार आहेत का?, गुणरत्न सदावर्ते यांचा सवाल

औरंगाबादच्या जजेसच्या निवासस्थाने बांधकाममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.

इम्तियाज जलील हे पीएफआयचे सहानुभूतीदार आहेत का?, गुणरत्न सदावर्ते यांचा सवाल
गुणरत्न सदावर्ते यांचे आवाहन
Image Credit source: t v 9
| Updated on: Sep 28, 2022 | 8:15 PM

दत्ता कानवटे, Tv9 मराठी प्रतिनिधी, औरंगाबाद : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेतली. कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सदावर्ते म्हणाले, इम्तियाज जलील यांचा मी निषेध करतो. इम्तियाज जलील हे पीएफआयचे सहानुभूतीदार आहेत का? इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. सुप्रिया सुळे यांनी जबाब दो स्लोगनची कॉपी केली आहे. राष्ट्रवादीने पीएफआयच्या बाबतीत आपली भूमिका जाहीर करावी, असं आवाहन गुणरत्न सदावर्ते यांनी केलं.

ते म्हणाले, शरद पवार यांच्या विरोधात मलबार हिल येथे आणि पुणे येथे तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीची चौकशी सीआयडी करत आहे. ते कधी रिअॅक्ट होत नाहीत. पण काल ते रिअॅक्ट झाले त्याचं कारण काय.? दाऊदने बॉम्ब ब्लास्ट केला. तो काळ शरद पवार यांच्या सत्तेचा काळ होता, याची आठवण सदावर्ते यांनी करून दिली.

औरंगाबादच्या जेजेसच्या निवासस्थाने बांधकाममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. एका आमदाराने यात हस्तक्षेप केला होता. टेंडर भरण्यापासून घोळ केला आहे. इम्तियाज जलील यांची वक्तव्य संभ्रम निर्माण करणारी आहेत. भारतात विघटन निर्माण करणाऱ्या संघटनेला इम्तियाज जलील समर्थन देत आहेत का, याची चौकशी झाली पाहिजे.

औरंगाबादच्या न्यायाधीशांच्या निवासस्थानाच्या बांधकाम प्रकरणात एका आमदार संजय शिरसाठ यांनी बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिली होती. 47 कोटी रुपये खर्चून न्यायाधीशांची निवासस्थाने बांधली जाणार होती.

आपको औरंगाबाद में काम करना हैं. आम्ही तुम्हाला मारून टाकू, अशी धमकी दिली होती, असा आरोपीही त्यांनी लावला. वंडर कन्स्ट्रक्शनला काम घ्यायचं होतं, म्हणून धमकी दिली होती. बाबा कंस्ट्रक्शन कंपनीला संजय शिरसाठ यांनी धमकी दिली होती, असंही ते म्हणाले. धनुष्यबाण हा डंके चोट पर शिंदे गटाला मिळणार, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.