Jalna | मटनाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून हाणामारी, जालन्यात 4 जखमी, एक गंभीर

या घटनेनंतर मटण विक्रेत्याने पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपींमध्ये वाद सुरु झाल्यावर लोधी मोहल्ला भागात जमाव एकत्र झाला. यात आरोपींनी कोयत्याने वार केल्याने चौघे जण जखमी झाले.

Jalna | मटनाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून हाणामारी, जालन्यात 4 जखमी, एक गंभीर
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 2:53 PM

जालनाः जालना शहरातून एक हाणामारीची बातमी आहे. शहरात रात्री लोधी मोहल्ला (Lodhi Mohalla) भागात दोन गटात तुंबळ हाणामारी (Jalna Rada) झाली. मटणाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून हा वाद सुरु झाला आणि पाहता पाहता दोन गट आपापसात भिडले. सुरुवातील शाब्दिक वाद होते, त्यानंतर शब्दाला शब्द वाढत गेला आणि दोन गटांचे भांडण विकोपाला गेले. दोन्ही गटातील लोक हाणामारीवर उतरले. यात चौघे जखमी (Injured) झाले तर जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती हाती आली आहे. चौघांवरही उपचार सुरु आहेत.

कधी, कुठे घडली घटना?

याबाबत अधिक माहिती अशी की, जालना शहरात रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. शहरातील लोधी मोहल्ला भागात मटनाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून दोन गटात हा वाद सुरु झाला. या वादात चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या चौघांवरही औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मटणविक्रेत्याची पोलिसात तक्रार

या घटनेनंतर मटण विक्रेत्याने पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपींमध्ये वाद सुरु झाल्यावर लोधी मोहल्ला भागात जमाव एकत्र झाला. यात आरोपींनी कोयत्याने वार केल्याने चौघे जण जखमी झाले. सदरबाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून एकूण सहा जणांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

चांदई घटनेत 250 जणांवर गुन्हे

दरम्यान जालन्यातील चांदई गावातील पोलिसांवरील दगडफेक प्रकरणी 200 ते 250 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 18 जणांना अटक झाली आहे. गावातील कमानीला नाव देण्यावरून या वादाला सुरुवात झाली होती. भोकरदन तालुक्यातल्या चांदई गावांमध्ये दोन गटात झालेल्या दगडफेकी नंतर आता पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन सुरू करत आरोपींची धरपकड सुरू केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 200 ते 250 जणांवर गुन्हे दाखल केले असून यातील गावातील सरपंचासह 18 जणांना पोलिसांनी अटक केलय, सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. काल झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी या प्रकरणात अडीचशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत., यातील 18 जणांना पोलिसांनी अटक केली असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. काल झालेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाले असून यात पोलिसांच्या दोन जीप व्हॅन तसेच अग्निशमन दलाच्या गाडीची देखील तोडफोड करण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.