AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कितीही लपवा, चोरी पकडली जाणारच! लाखोंचे दागिने जमिनीत पुरून गुलाबाचं रोपटं लावलं, जालना पोलिसांसमोर चोरट्यांची बोलती बंद!

विविध कॉलन्यांमध्ये जाऊन ज्या घरांना सलग दोन-तीन दिवस कुलूप असते, त्या ठिकाणी तो रेकी करतो आणि त्यानंतर तेथे घरफोडी करतो, अशी त्याची चोरीची मोडस ऑपरेंडी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

कितीही लपवा, चोरी पकडली जाणारच! लाखोंचे दागिने जमिनीत पुरून गुलाबाचं रोपटं लावलं, जालना पोलिसांसमोर चोरट्यांची बोलती बंद!
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 26, 2022 | 9:36 AM
Share

जालनाः चुकीचं कृत्य कितीही दडवलं तरी ते पकडलं जातंच. त्यात जर ती दुसऱ्यांच्या संपत्तीची चोरी असेल तर हे धन कधीही पचत नाही. जालन्यातल्या चोराचे (Jalna thieve ) असेच चोरी दडवण्याचे प्रयत्न उघडे पडले. शहरातल्या रुक्मिणी गार्डनजवळ 20 मे रोजी एका घरात चोरी झाली होती. रेकॉर्डवरील सराइत चोरट्याने घरातली रोख रक्कम आणि कपाटातील दागिने  (Gold Jewelry)असा एकूण 40 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. चोरीचे दागिने त्याने देऊळगावराजा (Deulgainraja) येथील घरासमोरच्या अंगणात पुरून ठेवले. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्यावर गुलाबाचं रोपटंही लावलं. जमिनीवर ओलावा करून ठेवला. पण पोलिसांनी त्यांच्याच भाषेत जाब विचारला असता सदर चोराने सर्व प्रकाराची कबूली दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

काय घडली घटना?

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, राजू सुरासे हा सराईत गुन्हेगार आहे. त्यानं 21 मे रोजी सायंकाळी आणि दुसऱ्या दिवशी एका घराची रेकी केली. घराला खूप वेळ कुलूप दिसे. त्यानंतर रात्री त्याने दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. चोरी केल्यानंतर त्यानं 40 लाखांच्या दागिन्यांपैकी साडे तीन लाख रुपयांचे दागिने घराच्या अंगणात पुरून ठेवले. अंगावरील कपडे जाळले आणि दुचाकीही लपवून ठेवली. चोरीच्या घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व सदर बाजार पोलिसांनी तपास सुरु केला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली. पोलिसांनी राजूला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता सगळा प्रकार उघडकीस आला.

दागिने विकत घेणाऱ्यालाही अटक

आरोपी राजू याने सराफ सुजित भाऊलाल सावजी याला दागिने विकले होते. पोलिसांनी सुजितला अटक करून त्याच्याकडून 9 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी राजू हा रेकॉर्डवरील असून त्याने जवळपास 30 चोऱ्या, घरफोड्या केल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. औरंगाबाद, बुलडाणा, जालना या तिन्ही जिल्ह्यात त्याच्यावर दुन्हे दाखल आहेत. विविध कॉलन्यांमध्ये जाऊन ज्या घरांना सलग दोन-तीन दिवस कुलूप असते, त्या ठिकाणी तो रेकी करतो आणि त्यानंतर तेथे घरफोडी करतो, अशी त्याची चोरीची मोडस ऑपरेंडी असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.