Video: औरंगाबाद-जालना रोडवरील तो भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद! काळ आणि वेळ एकाचवेळी येण्याचा तो दुर्दैवी क्षण

Video: औरंगाबाद-जालना रोडवरील तो भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद! काळ आणि वेळ एकाचवेळी येण्याचा तो दुर्दैवी क्षण
अंगावर काटा आणणारा अपघात
Image Credit source: TV9 Marathi

Aurangabad Accident News : रस्त्याच्या एका बाजूला काही जण उभे असल्याचंही दिसून आलंय. या अपघातानंतर रस्त्यावर असलेल्यांनाही मोठा धक्का बसला होता.

दत्ता कानवटे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 26, 2022 | 10:29 PM

औरंगाबाद : औरंगाबाद जालना (Aurangabad Jalana Road Accident) रोडवर भीषण अपघात झाला. 25 मे रोजी संध्याकाळी जवळगाव फाट्यावर झालेल्या या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज (Accident CCTV Video) समोर आलंय. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या अपघातात चौघांचा जागीच जीव गेला होता. भरधाव बोलेरो कार आणि एसटी यांच्या (Bolero car Accident) समोरासमोर जोरदार धडक झाली होती. ही धडक इतकी भीषण होती की एसटी बससह बोलेरो कारचाही चक्काचूक झालाय. संध्याकाळी 6 वाजून 39 मिनिटांनी हा भीषण अपघात झाला. कळमनुरी-पुणे बस आणि एक बोलेरो कार यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघाताचा अंगावर काटा आणणार सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे. या अपघातात झालेल्या धडकेनंतर आलेला आवाज धडकी भरवणारा होता. तसंच प्रत्यक्षदर्शीही हा अपघात पाहून थबवले होते.

कसा झाला अपघात?

एक काळ्या रंगाची जीप भरधाव वेगानं येताना दिसते. ही कार प्रचंड वेगात असता. डाव्या लेनमधून चालक ही कार उजव्या लेनमध्ये आणण्याच्या प्रयत्नात असतो. पण गाडीचा वेग इतका भयंकर असतो, की चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटतं. गाडी लेन सोडून थेट डिव्हायरवर चढते.

डिव्हायरवर चढून गाडी थांबत नाही, तर डिव्हायर पार करुन विरुद्ध दिशेलाही घुसते. यानंतरही गाडी कंट्रोल होण्याच्या पलिकडे गेलेली असते. नेमक्या याच क्षणी समोरच्या दिशेनं भरधाव वेगानं एसटी येत असते. एसटी चालकाला ब्रेक लावण्याची संधी मिळावी, याच्याआधीच अंगावर काटा आणणारा प्रसंग घडतो. एसटी आणि काळ्या रंगाची जीप यांच्या इतकी भीषण धडक होते, की जीपचा अक्षरशः चेंदामेंदा होतो. या भीषण अपघातामध्ये कारमधील प्रवाशांना जबर मार बसतो आणि जागीच काहींचा जीव जातो.

पाहा व्हिडीओ :

सीसीटीव्ही फुटेजमध्ये यावेळी रस्त्याच्या एका बाजूला काही जण उभे असल्याचंही दिसून आलंय. या अपघातानंतर रस्त्यावर असलेल्यांनाही मोठा धक्का बसला होता. अपघातानंतर झालेल्या धडकी भरवणाऱ्या आवाजानं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं होतं. जखमींना उपचारासाठी औरंगाबादकडे रवानादेखील करण्यात आलं. या अपघातामुळे औरंगाबाद-जालना महामार्गावरील वाहतूक उशिरापर्यंत बंद करण्यात आली होती.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें