औरंगाबाद-जालना मार्गावर भीषण अपघातात चार जण ठार; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. तर जखमींना तात्काळ औरंगाबादकडे पाठवण्यात आले

औरंगाबाद-जालना मार्गावर भीषण अपघातात चार जण ठार; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 8:09 PM

औरंगाबाद: औरंगाबाद-जालना मार्गावरील (Auragabad-Jalana Road) गाढे जवळगाव फाट्यावर बस आणि जीपचा भीषण अपघात (Bus-jeep Accident) होऊन 5 जण जागीच ठार (Five Death) झाले. हा अपघात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक उशिरापर्यंत ठप्प झाली होती. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. तर जखमींना तात्काळ औरंगाबादकडे पाठवण्यात आले.

कळमनुरी-पुणे बस आणि एका जीपमध्ये गाढे जवळगाव फाट्यावर सायंकाळी हा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की जीपचा समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. बसच्या धडकेमुळे जीप रस्ता दुभाजकावर आडवी झाली. यामध्ये पाच जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. जीपला बसने जोरदार धडक दिल्याने मृतांची आकडा वाढण्याची संख्या वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांची तात्काळ अपघातस्थळी धाव

या अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. जखमींना उपचारासाठी औरंगाबादकडे रवाना करण्यात आले असून रस्त्यावरील वाहतून सुरळीत करण्यात येत होती. या अपघातामुळे जालना रोडवरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. खूप उशिरापर्यंत या मार्गावरील वाहतून बंद करण्यात आली होती.

बघ्यांचीही मोठी गर्दी

अपघातानंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यामुळे वाहनातील जखमींना बाहेर काढण्याचे काम तात्काळ सुरु करण्यात आले. अपघातावेळी जागीच पाच जणांचा मृत्यू झाल्याने बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून जीपच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला होता.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...