Aurangabad: 68 टक्के भरले जायकवाडी धरण; नदीकाठच्या 35 गावांना सतर्कतेचा इशारा

| Updated on: Jul 17, 2022 | 1:00 PM

औरंगाबाद, जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) सध्या 68 टक्के पाणी आले (jayakwadi dam water level)आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी  जलाशयात नाशिकहून पाण्याची आवक मोठ्याप्रमाणात सुरूच आहे. त्यामुळे पैठण, गंगापूर आणि वैजापुरातील नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले आहे. दरम्यान प्रशासनाने जिल्ह्यातील […]

Aurangabad: 68 टक्के भरले जायकवाडी धरण; नदीकाठच्या 35 गावांना सतर्कतेचा इशारा
Follow us on

औरंगाबाद, जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) सध्या 68 टक्के पाणी आले (jayakwadi dam water level)आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी  जलाशयात नाशिकहून पाण्याची आवक मोठ्याप्रमाणात सुरूच आहे. त्यामुळे पैठण, गंगापूर आणि वैजापुरातील नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले आहे. दरम्यान प्रशासनाने जिल्ह्यातील 35 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गंगापूर तालुक्यातील ग्रामस्थांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. जुन्या नेवरगावाच्या ग्रामस्थांनी पुनर्वसित गावात स्थलांतरित व्हावे. पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल, नेवरगाव- ‘पीरवाडी रस्ता दुरुस्त करण्यात येईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

जीवितहानीच्या घटना घडल्या

यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 6 जणांचा वीज पडून तर तर 3 जणांचा पुरात वाहून बळी गेला आहे. बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना 4 लाख प्रति व्यक्ती प्रमाणे शासकीय मदत देण्यात आली आहे. याशिवाय   २० लहान-मोठी जनावरेसुद्धा दगावली आहेत.

 

हे सुद्धा वाचा

घरे पडली

कच्ची घरे मोठ्या प्रमाणात पडली. पावसामुळे भिंती पडणे, छत कोसळणे आदी घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. बहुतांश घटना ग्रामीण भागात घडल्या आहेत.

आतापर्यंतचा पाऊस

सरासरीपेक्षा 73 मि.मी. जास्तीचा पाऊस जिल्ह्यात जून व महिन्यांच्या जुलैमध्ये  सरासरीच्या तुलनेत 73 मि.मी. पाऊस जास्तीचा झाला आहे.

198 मि.मी, पर्जन्यमान अपेक्षित होते, त्या तुलनेत २७१ मि.मी. पर्जन्यमान झाले आहे.

अजून पावसाचे अडीचे महिने जायचे आहेत. येणार्‍या काळात जास्तीचा पाऊस झाला तर पिकांचे नुकसान होण्याची शेतकर्‍यांना भीती आहे.

 

अतिवृष्टीने पिकांना धोका

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे केवळ खरिपातील तूर,मूग, उडीद, सोयाबीन आणि कापसाचेच नुकसान झाले असे नाही तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीचे उत्पादन क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. लागवड होताच पाणी साचून राहिल्याने हळद पीक सडले आहे. तीच अवस्था ऊसाचीही झाली त्यामुळे अधिकच्या पावसामुळे खरिपातील पिकांचेच उत्पादन घटणार असे नाहीतर ऊस आणि हळदीवरही त्याचा परिणाम होणार आहे. अतिवृष्टीनंतर जमिनीत अजून मोठ्या प्रमाणात ओलावा टिकून असल्याने दुबार पेरणी देखील शक्य नाही.