“दंगलीत भाजप-शिवसेनेचा रोल होता, हे मी सिद्ध करतो”; या खासदाराने मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळ्यांवर केले गंभीर आरोप

कालीचरणला महाराष्ट्रात फिरू देऊ नका, त्याला जेलमध्ये टाका, महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांवरही माझा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांमार्फत या दंगलीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

दंगलीत भाजप-शिवसेनेचा रोल होता, हे मी सिद्ध करतो; या खासदाराने मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळ्यांवर केले गंभीर आरोप
| Edited By: | Updated on: May 15, 2023 | 5:04 PM

औरंगाबाद : किराडपुरा दंगल प्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला जबाबदार धरत त्यांनी कालिचरण महाराज यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. या दंगल प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणीही जलील यांनी केल्याने आता हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे. यावेळी इम्तियाज जलील यांनी किराडपुरा दंगलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. मात्र त्या पत्राची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ओळीत प्रतिक्रिया देऊन केल्यामुळे त्यावरूनही त्यांच्यावर प्रचंड टीका केली जात आहे.
किराडपुरा दंगलीसाठी पोलिसांचा रोल संशयास्पद झाला आहे असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. तर दुसरीकडे कालीचरण यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

कालिचरणसारखे लोक येऊन भडकाऊ भाषण करत असतात त्यांना का अडवले जात नाही असा प्रतिसवालही जलील यांनी राज्य सरकारला केला आहे.

या दंगलीवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

किराडपुरा दंगलीची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, त्यासाठी मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवले होते मात्र यांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे पर्याय नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र पाठवले होते. मात्र त्यावर नरेंद्र मोदी यांनी मला फक्त एका ओळींचे पत्र पाठवले आहे.

मी काही नरेंद्र मोदी यांना टाईमपास म्हणून पत्र पाठवले नव्हते, तर मला फक्त पत्र मिळाले म्हणून एका ओळींचे पत्र पाठवले असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

किराडपुरा दंगलीची न्यायाधीशांमार्फत चौकशी का करत नाही, कारण त्यांना अडकण्याची त्यांना भीती वाटत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे डिजी आणि गृहमंत्री का गप्प बसलेले आहेत. या दंगलीत भाजपचा आणि शिवसेनेचा रोल होता, हे मी सिद्ध करून दाखवतो असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

कालीचरणसारखे गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे दंगली होत आहेत, या कालीचरणची लायकी काय आहे? त्यांची लायकी काढत स्टेजवर उभं राहून शिव्या घालणे हा काय धर्म आहे का.? असा सवालही खासदार जलील यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे कालीचरणला महाराष्ट्रात फिरू देऊ नका, त्याला जेलमध्ये टाका, महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांवरही माझा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांमार्फत या दंगलीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही समोर येऊन उत्तर देण्यापेक्षा माझ्या पत्राला उत्तर द्यावे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.