मुंबई कोकणात धुवाँधार मात्र मराठवाड्यात अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा, धरणक्षेत्रात पाऊसच नाही!

| Updated on: Jul 21, 2021 | 9:28 AM

गेले तीन ते चार दिवस मुंबई आणि कोकणात धुवाँधार पाऊस बरसतोय. मात्र दुसरीकडे मराठवाड्याला अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.

मुंबई कोकणात धुवाँधार मात्र मराठवाड्यात अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा, धरणक्षेत्रात पाऊसच नाही!
विदर्भात ऑगस्ट महिन्यातही पाऊस सामान्यच
Follow us on

औरंगाबाद : गेले तीन ते चार दिवस मुंबई आणि कोकणात धुवाँधार पाऊस बरसतोय. मात्र दुसरीकडे मराठवाड्याला अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. दरवर्षीप्रमाणे मराठवाडा अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. जुलै महिन्याचे 20 दिवस उटलून गेले आहेत पण पावसाने म्हणावं असं दर्शन दिलेलं नाहीय.उर्वरित महाराष्ट्रात वरुणराजाने हजेरी लावली असली तरी मराठवाड्यात मात्र पावसाने दडी मारल्याचं चित्र आहे. (Mumbai Konkan heavy Rain Marathwada Waiting Rain)

आज मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज

औरंगाबाद जिल्ह्यात आज तुरळक पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. गेले अनेक दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र आज तुरळक पावसाच्या अंदाज आहे. मराठवाड्यात मात्र अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. मोठ्या पावसाअभावी मराठवाड्यातील अनेक धरणे भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आज संपूर्ण मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.

मराठवाड्यातील धरणक्षेत्रात पाऊस नाही

मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मात्र मराठवाड्यावरच वरुणराजा रुसलाय की काय, हे कळायला मार्ग नाही. जुलैचे 20 उलटून गेले तरीही मराठवाड्यात चांगला पाऊस झाला नाही. क्धरणक्षेत्रात तर अजिबातच पाऊस झालेला नाहीय. परिणामी मोठ्या पावसाअभावी मराठवाड्यातील अनेक धरणे भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

मुंबईत मुसळधार

मुंबईत गेले तीन ते चार दिवस जोरदार पाऊस बरसतोय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगराच्या परिसरात वेगवान वाऱ्यांसह पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमधील सततच्या पावसामुळे मिठी नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. अशातच बुधवारी सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस सुरुच राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा जलमय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या 24 वॉर्डांमध्ये यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोकणात धुवाँधार

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकणात जोरदार पाऊस बरसतोय. नद्या-नाले तुडूंब भरुन वाहू लागलेत. अतिपावसाने काही नद्यांना तर पूर आलाय. असाच पाऊस आणखी पुढचे चार दिवस कोसळण्याच अंदाज आहे.

(Mumbai Konkan heavy Rain Marathwada Waiting Rain)

हे ही वाचा :

मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, समुद्रात भरतीचा इशारा; मिठी नदीही तुडुंब भरली