पंकजा मुंडे राजकीय अस्तित्वाच्या शोधात? शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू; 5 हजार किलोमीटर प्रवास; काय आहे कारण?

| Updated on: Sep 04, 2023 | 1:09 PM

मला मानणारा वर्ग भेटायला या म्हणून सांगत होता. त्यामुळे राज्यातील ज्योतिर्लिंग आणि शक्ती पीठ दर्शन करण्यासाठी निघाले आहे. जवळपास 5 हजार किमीचा प्रवास करणार आहे. या यात्रेचा समारोप ज्योतिर्लिंग परळी येथे होईल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे राजकीय अस्तित्वाच्या शोधात? शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू; 5 हजार किलोमीटर प्रवास; काय आहे कारण?
pankaja munde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद | 4 सप्टेंबर 2023 : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची आजपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. पंकजा मुंडे या यात्रेच्या माध्यमातून आठ दिवस राज्यातील काही जिल्हे पिंजून काढणार आहे. विविध धार्मिकस्थले आणि शक्तीपिठांना भेट देणार आहेत. जनतेशी संवादही साधणार आहेत. पंकजा मुंडे यांच्या या यात्रेने भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी काढलेल्या यात्रेची आठवणही केली जात आहे. गोपीनाथ मुंडे यांनी 1994 संघर्ष यात्रा काढली होती. त्यानंतर राज्यातील काँग्रेसचं सरकार गेलं होतं. मात्र, पंकजा मुंडे यांच्या या शिवशक्ती परिक्रमेमुळे त्या राजकीय अस्तित्वाच्या शोधात आहेत का? अशी चर्चाही सुरू झाली आहे.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा शिवशक्ती परिक्रमा दौरा आजपासून सुरू झाला आहे. या दौऱ्याचा आज पहिला दिवस आहे. औरंगाबाद येथील संत भगवानबाब मंदिरात दर्शन घेऊन परिक्रमेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी मंदिरात आरतीही केली. त्यांनी वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेवाचे दर्शनही घेतलं. आज त्या औरंगाबाद ते नाशिक असा प्रवास करणार आहेत. 4 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरपर्यंत पंकजा मुंडे यांची ही परिक्रमा सुरू राहणार आहे. या काळात त्या पाच हजार किलोमीटरचा त्या प्रवास करणार आहेत. यावेळी ज्योतिर्लिंग आणि शक्ती पीठांचे त्या दर्शन घेणार आहेत.

मी उतणार नाही

शिवाची शक्ती आणि माझी शक्ती दोघांचेही दर्शन व्हावे म्हणून ही परिक्रमा करण्यात येत आहे. आज भगवान बाबांची जयंती आहे. भगवान बाबा यांच्या समोर नतमस्तक होऊन मी ही परिक्रमा करत आहे. आज माझे वडील सोबत नाहीत, भगवान बाबाही नाहीत. माझे वडील जिथे असतील तिथून मला आशीर्वाद देतील.

हे सुद्धा वाचा

मुंडे साहेबाना देखील अभिमान वाटेल अशी माझी परिक्रमा आहे. भक्ती आणि शक्तीचा हा जागर आहे, असं त्या म्हणाल्या. मध्यप्रदेश देखील माझं माहेर आहे. अहिल्याबाई यांनी मंदिरांचा जीर्णोध्दार केला नसता तर आज आपल्याला दर्शन मिळाले नसते. मी उतणार नाही, मातणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मी उत्नार नाही

राजकारण म्हणून पाहतील

मी राजकारणातली व्यक्ती आहे. त्यामुळे माझ्या या दौऱ्याकडे राजकीय दृष्टीने पाहिले जाईल. या दौऱ्याला पक्षाचा अजेंडा नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मायबापाची भूमिका घ्या

मराठा आरक्षणावरही त्यांनी भाष्य केलं. या परिस्थितीकडे मी फार चिंतेने पाहते. चर्चा करून योग्य निर्णय झाला पाहिजे. लाठी हल्ल्याची निष्पक्षपाती चौकशी व्हावी. सीरियस अटेंशनची गरज आहे. ओबीसी आरक्षणाची भूमिका मांडताना आम्ही मराठा आरक्षणाबद्दल देखील विचार करावा, अशी आमची जुनीच मागणी आहे. सत्ताधाऱ्यांनी मायबापाची भूमिका घ्यावी. आंदोलकांच्या मागणीचा गंभीरपणे विचार करावा. कागदपत्रे न्यायालयात टिकतील असा विचार करावा. ओबीसी आणि मराठा आरक्षण वेगळे आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राजकीय अस्तित्वाच्या शोधात?

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आपल्या दौऱ्याकडे राजकीयदृष्टीने न पाहण्याचं आवाहन केलं आहे. असं असलं तरी राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने पंकजा मुंडे यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत आला आहे. धनंजय मुंडेही सत्तेत आहेत.

त्यामुळे ते परळीची जागा सोडणार नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडे यांना परळीतून विस्थापित होण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. या दौऱ्यातून पंकजा मुंडे शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं सांगितलं जात आहे.