आज माझा भरून आला आहे ऊर, कारण पाठीशी उभं आहे वाळूज पंढरपूर, रामदास आठवलेंनी जिंकलं औरंगाबादकरांचं मन

| Updated on: Feb 22, 2022 | 9:43 AM

राज्यातील मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीच्या धोरणावर बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतः दारू घेत नाहीत मग जनतेला का दारू पाजताहेत? असा सवाल रामदास आठवले यांनी वाळूज येथील कार्यक्रमात केला.

आज माझा भरून आला आहे ऊर, कारण पाठीशी उभं आहे वाळूज पंढरपूर, रामदास आठवलेंनी जिंकलं औरंगाबादकरांचं मन
Follow us on

औरंगाबादः केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी औरंगाबादमधील वाळूज परिसरात (Waluj MIDC Aurangabad) एका कार्यक्रमात त्यांच्या खुमासदार शैलीत कविता (Ramdas Athavale poem) सादर करून वाळूजकरांची मनं जिंकली. वाळूजमधील बजाजनगर येथील आम्रपाली बुद्धविहारात सोमवारी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. आठवले हे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सोमवारच्या कार्यक्रमात त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर त्यांच्या शैलीत भाष्य केले. राज्यातील मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीच्या धोरणावर बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतः दारू घेत नाहीत मग जनतेला का दारू पाजताहेत? या वेळी व्यासपीठावर बाबूराम कदम पप्पू कागदे, मिलिंद शेळके, संजय ठोकळ, प्रवीण नितनवरे, शरद कीर्तिकर, अनिल चोरडिया, संतोष लाठे आदींची उपस्थिती होती.

….वाळूजकर खळखळून हसले

मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी वाळूजकरांवर कविता सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. ती कविता पुढीलप्रमाणे-

आज माझा भरून आला आहे ऊर
कारण माझ्या पाठीशी उभं आहे वाळूज-पंढरपूर
मी तर आहे भीमाच्या तालमीत तयार झालेला शूर
म्हणून मी बदलून टाकणार आहे वाळूज-पंढरपूरचा नूर
तुम्ही सर्वांनी लावलात माझ्या खांद्याला खांदा
म्हणून मी करून टाकला आहे बऱ्याच लोकांचा वांदा…

प्रकाश आंबेडकरांवर निशाणा

वाळूज येथील कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी आता ऐक्य आम्हाला मान्य नाही, ही भूमिका सोडली पाहिजे. ऐक्याचा विषय मी मांडलेला आहे. पण प्रकाश आंबेडकर हे भेटण्यासाठी वेळ देतील असं वाटत नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय ऐक्य शक्य नाही.

शिवसेना-भाजप भांडण मिटले पाहिजे- आठवले

दरम्यान, ठाकरे सरकारवर टीका करताना रामदास आठवले म्हणाले, सरकार मॅनेजमेंट करण्यापेक्षा एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त आहे. सरकारकडून विकास कामांचा योग्य आढावा घेतला जात नाही. सरकार पाडण्यासाठी संजय राऊत यांच्यावरील आरोप निरर्थक आहेत. तसेच शिवसेना आणि भाजपचे भांडण मिटले पाहिजे, असं आम्हाला वाटतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत पुढाकार घ्यावा, संजय राऊत यांना समज द्यावी, शिवसेना भाजप एकत्र आले पाहिजे. दोन्ही काँग्रेससोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल. तसेच जुन्या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्यास भाजपसुद्धा तयार होईल, अशी शक्यता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

इतर बातम्या-

Travel Special: दक्षिण भारतातील निसर्गाचे सौंदर्य बघायचे आहे? मग ‘या’ 5 ठिकाणांना नक्की भेट द्या!

दोघे भाऊ बहिणीच्या घरी भांड-भांड-भांडले, वादात मध्यस्थी करणाऱ्या भावोजींची हत्या