Beed: गुटखा जप्तीप्रकरणी पोलिसांवर दबाव टाकणे भोवले, बीड शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंची उचलबांगडी

गुटखा प्रकरणी पोलिसांवर दबाव आणल्याने बीडचे कुंडलिक खाडे तर अवैध बायोडिझेल प्रकरणात अहमदनगरचे दिलीप सातपुते यांचे नाव आल्याने शिवसेना पक्षातर्फे पदावरून बडतर्फीची कारवाई करण्यात आली.

Beed: गुटखा जप्तीप्रकरणी पोलिसांवर दबाव टाकणे भोवले, बीड शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंची उचलबांगडी
बीडचे कुंडलिक खाडे आणि अहमगनगरचे दिलीप सातपुते यांच्यावर पक्षाची कारवाई
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 11:38 AM

बीडः शहरातील गुटखा प्रकरणी पोलिसांवर दबाव आणण्याची भाषा करणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुखांना ही वर्तणूक महागात पडली आहे. बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे (Kundlik Khade) यांच्यावर या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची पक्षाने गंभीर दखल घेतली असून त्यांच्या जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती दिली आहे. नवीन जिल्हाप्रमुखाची घोषणा पक्षाकडून लवकरच केली जाईल. तर अहमदनगरमधील शहर प्रमुखांवरही पक्षाने कारवाई केली आहे.

32 लाखांचा गुटखा जप्तीचे प्रकरण

बीड शहराजवळील इमामपूरच्या गोदामात पोलिसांनी जप्त केलेल्या 32 लाखांच्या गुटख्याप्रकरणात कुंडलिक खांडे यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची दखल घेत कुंडलिक खांडे यांचे पद स्थगित करण्यात आले आहे.

अहमदनगरमध्ये दिलीप सातपुतेंना हटवले

बीडप्रमामेच अहमदनगरमधील बहुचर्चित बेकायदा बायोडिझेल प्रकरणात नाव आलेले शहरप्रमुख दिलीप सातपुते यांचीही या पदावरून उचलबांगडी करण्यात आ ली आहे. या प्रकरणात सुमारे 22 आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यात सातपुते यांचेही नाव पुढे आले आहे. सातपुते सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

इतर बातम्या-

भीषण अपघात! भरधाव कार तीन वेळा पलटली, ओढ्यात कोसळली, एअरबॅगमुळे वाचले चौघांचे प्राण, औरंगाबादची घटना

40 हजार लिटर Biodiesel नाशिकमध्ये जप्त; 26 लाखांचा मुद्देमाल, 4 जणांवर गुन्हा