हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप, इम्तियाज जलील यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

| Updated on: Jan 28, 2021 | 10:49 AM

हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप इम्तियाज जलील यांच्यावर करण्यात आला आहे. (Republican Vidyarthi Sena Imtiaz Jaleel)

हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप,  इम्तियाज जलील यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार
इम्तियाज जलील, खासदार, एमआयएम
Follow us on

औरंगाबाद : खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या (Republican Vidyarthi Sena) कार्यकर्त्यांनी ही तक्रार दाखल केली असून जलील यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप या विद्यार्थी सेनेने केला आहे. गुरुवारी (27 जानेवारी) इम्तियाज जलील यांच्यासमोर दोन गटांत बाचाबाची झाली होती. त्यांनतर जलील यांनी धमकी दिल्याचा आरोप विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विद्यार्थी सेनेने केलेल्या तक्रारीत जलील यांच्यासोबतच अभियंता अशोक येरेकर यांच्यासुद्धा नावाचा उल्लेख आहे. (Republican Vidyarthi Sena file case against MP Imtiaz Jaleel)

नेमका प्रकार काय?

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहे आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील रस्त्यावरून काल (27 जानेवारी) काही तरुण आणि इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यांनतर इम्तियाज जलील यांनी तरुणांना दमबाजी केल्याचा आरोप तरुणांनी केला होता. तर दुसरीकडे तर तरुणांनाकडून इम्तियाज जलील यांना शिवीगाळ झाल्याचे  जलील समर्थकांनी म्हटलं होतं. विद्यार्थी सेनेचे तरुण आणि इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

बाचाबाचीनंतर जलील यांची तरुणांना धमकी

गुरुवारी जलील समर्थक आणि काही तरुण यांच्यामध्ये बाचाबाची झाल्यानंतर जलील यांनी काही तरुणांना हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद पोलीस आयुक्तालयात तशी तक्रारसुद्धा दिली आहे. दाखल तक्रारीत जलील यांच्यासोबत अभियंता अशोक येरेकर यांच्यासुद्धा नावाचा उल्लेख आहे.

 

संबंधित बातम्या :

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : औरंगाबादमध्ये एमआयएमचा दबदबा, 65 जागांवर विजयी

राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला मशिदी उघडू, जलील यांचे अल्टिमेटम

ओवैसी आता ममतादीदींना भिडणार, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी MIM चा शड्डू

(Republican Vidyarthi Sena file case against MP Imtiaz Jaleel)