“खैरे यज्ञाला बसला तरी, निकाल आमच्या बाजूनेच लागेल”; शिवसेनेच्या नेत्याने अपात्रतेच्या मुद्यावरून ठाकरे गटाला ठणकावून सांगितले

| Updated on: May 10, 2023 | 8:23 PM

आमदार संदीपान भुमरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करताना एकेरी भाषेचा वापर करत म्हणाले की, खैरे यज्ञाला बसला तरी त्याला जास्त महत्व देऊ नका.

खैरे यज्ञाला बसला तरी, निकाल आमच्या बाजूनेच लागेल; शिवसेनेच्या नेत्याने अपात्रतेच्या मुद्यावरून ठाकरे गटाला ठणकावून सांगितले
Follow us on

औरंगाबाद : राज्यातील सत्तासंघर्षाचं नाट्य आता टोकाला पोहचले आहे. राज्यातील 16 आमदारांच्या कारकीर्दीवर उद्या सुप्रीम कोर्टाचा निकाल लागणार असून त्यामुळे आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आपापली मतं व्यक्त केली जात असली तरी न्यायालय निर्णय का देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. न्यायालयाचा निकाल उद्या लागणार असला तरी उद्याच्या निकालाविषयी मात्र शिवसेनेच्या आमदारांकडून हा निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना आमदार संदीपान भुमरे यांनी हा निकाल आमच्याच बाजूने लागणार असून, त्यांनी ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

आमदार संदीपान भुमरे यांनी उद्या न्यायालयाच्या निकालाविषयी हा निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ज्या ज्या आमदारांनी बंड केले होते. त्या बंडाचे त्यांनी समर्थनही केले आहे.

तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्यांवर त्यांनी सडकून टीकाही केली आहे. त्यामुळे उद्या जरी हा निकाल लागणार असला तरी त्यामुळे भविष्यात हा वाद आणखी चिघळणार असल्याची शक्यता दिसून येत आहे.

शिवसेनेचे 16 आमदार अपात्र झाले किंवा त्यांच्या बाजूने निकाल लागला तरीही राज्यातील राजकारण आणखी ढवळून निघणार आहे.

शिवसेनेच्या नेत्यानी उद्याचा न्यायालयाच निकाल आमच्या बाजूने लागणार असून ज्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत, त्याचा काही फायदा होणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

उद्याच्या निकालाविषयी बोलताना आमदार संदीपान भुमरे म्हणाले की, सत्तासंघर्षाची चर्चा देशभर सुरू आहे. देशात आणि राज्यात ही चर्चा चालू असली तरी हा निकाल आमच्याच बाजूने लागेल कारण आमची सत्याची बाजू सत्याची आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

काही महिन्यापूर्वी आम्ही उठाव केला होता, त्यामुळे त्यामध्ये काही गैर नाही, हा निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे. उद्या न्यायालयाचा निकाल असला तरी आम्हाला त्याची धाकधूक लागलेली नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. बंडखोरी केली त्यामध्ये आमची काही चूक नाही त्यामुळे धाकधूक लागण्याचे काही कारणही नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार संदीपान भुमरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करताना एकेरी भाषेचा वापर करत म्हणाले की, खैरे यज्ञाला बसला तरी त्याला जास्त महत्व देऊ नका. देव पाण्यात बुडवून बसलाय खैरे आता काही महत्व देण्यासारखा माणूस राहिलेला नाही असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.