औरंगाबादमधील 15 खासगी प्रयोगशाळांना मनपाच्या नोटिसा, अँटिजन, RTPCR टेस्ट करण्यास टाळाटाळ!

| Updated on: Jan 17, 2022 | 5:00 PM

परवानगी घेतल्यानंतरही खासगी लॅबचालकांकडून अँटिजन, आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी टाळाटाळ केल्याने ही कारवाई करण्यात आली. या प्रयोगशाळांची परवानगी का रद्द केली जाऊ नये, असे विचारत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

औरंगाबादमधील 15 खासगी प्रयोगशाळांना मनपाच्या नोटिसा, अँटिजन, RTPCR टेस्ट करण्यास टाळाटाळ!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबाद: शहरातील कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खासगी प्रयोगशाळांनी मनपाकडून अँटिजन आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी परवानगी मागितली होती. अशा 39 प्रयोगशाळांनी परवानगी मागितली होती. मात्र त्यातील 15 प्रयोगशाळांतर्फे एकही अँटिजन, आरटीपीसीआर टेस्ट केली नसन्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाकडून 15 प्रयोगशाळांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

काय आहे नेमके कारण?

राज्यातील एनएबीएल आणि आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर तपासणीसाठी कमाल विक्री मूल्य निश्चित करण्याबाबत 6 डिसेंबर 2021 रोजी शासन निर्णय काढण्यात आला. या निर्णयानुसार, महापालिकेकडून शहरातील 39 खासगी प्रयोगशाळा चालकांनी अँटिजन, आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी परवानगी घेतली. त्यासाठी रुग्ण स्वतःहून लॅबमध्ये तपासणीसाठी आल्यास 100 रुपये, तपासणी केंद्रावरून नमूने घेतल्यास 150 रुपये, रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमूना घेतल्यास 250 रुपये फीस आकारण्याची सूचना महापालिकेने केली. मात्र परवानगी घेतल्यानंतरही खासगी लॅबचालकांकडून अँटिजन, आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी टाळाटाळ केल्याने ही कारवाई करण्यात आली. या प्रयोगशाळांची परवानगी का रद्द केली जाऊ नये, असे विचारत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

इतर बातम्या-

Goa Poll: राष्ट्रवादीची शिवसेनेशी आघाडी, उद्या पटेल, आव्हाड गोव्यात जाऊन चर्चा करणार

Aurangabad: खासदारांनी स्वतःच्या निधीतूनच मराठी पाट्या लावाव्यात, शिवसेनेचा इम्तियाज जलील यांना टोला!