Aurangabad Election: सोयगाव नगर पंचायतीच्या 4 जागांसाठी आज मतदान, 12 उमेदवार रिंगणात!

| Updated on: Jan 18, 2022 | 6:30 AM

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येथील 13 जागांसाठीचे मतदान पार पडले होते. एकूण 17 जागांपैकी आता उर्वरीत चार प्रभागांमध्ये आज मतदान घेतले जाईल. उद्या 19 जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

Aurangabad Election: सोयगाव नगर पंचायतीच्या 4 जागांसाठी आज मतदान, 12 उमेदवार रिंगणात!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः सोयगाव नगरपंचायतीच्या चार जागांसाठी आज मतदान घेतले जाणार आहे. यासाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपा-शिवसेना आणि आघाडी यांच्यात चारही प्रभागात तिरंगी लढती होणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्जांच्या माघारीनंतर चार जागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. यापूर्वी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येथील 13 जागांसाठीचे मतदान पार पडले होते. एकूण 17 जागांपैकी आता उर्वरीत चार प्रभागांमध्ये आज मतदान घेतले जाईल. उद्या 19 जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

4 जागांमध्ये तिरंगी लढतीचे चित्र

सोयगावमधील चार प्रभागांसाठी ही निवडणूक होत आहे. चार प्रभागासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी या तिघांचे प्रत्येकी तीन उमेदवार रिंगणात असून काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादीचे दोन याप्रमाणे आघाडीने चार जागा वाटून घेतल्या आहे. त्यामुळे चार जागांसाठी तिरंगी लढत लक्षवेधी होणार असल्याचे चित्र आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचा निकाल 19 जानेवारीला

सोयगावमधील एकूण 17 पैकी 13 जागांसाठी यापूर्वी 21 डिसेंबरला मतदान झाले होते. तेरा जागांच्या निवडणुकीनंतर पुन्हा चार जागांसाठी सोयगावला रणसंग्राम रंगणार असून यामध्ये आता या चार जागांमध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे. प्रभाग एक,दोन,चौदा आणि सोळा यासाठी निवडणूक होत असून बारा उमेदवारांमध्ये सहा महिला उमेदवार रिंगणात असून भाजपा-दोन,शिवसेना-दोन,राष्ट्रवादी-एक आणि कॉंग्रेस-एक याप्रमाणे महिला उमेदवार रिंगणात असून महिला उमेदवार असलेल्या प्रभागात चांगलीच चुरस पहावयास मिळणार आहे.

इतर बातम्या-

Wardha : आर्वी प्रकरणात वैद्यकीय कायद्याचे ज्ञान असलेले शासकीय वकील देण्याची मागणी करणार – मनीषा कायंदे

किरण माने वादात आता रुपाली चाकणकरांची एन्ट्री, मालिकेच्या निर्मातीला खुलासा मागितला!