Wardha : आर्वी प्रकरणात वैद्यकीय कायद्याचे ज्ञान असलेले शासकीय वकील देण्याची मागणी करणार – मनीषा कायंदे

Wardha : आर्वी प्रकरणात वैद्यकीय कायद्याचे ज्ञान असलेले शासकीय वकील देण्याची मागणी करणार - मनीषा कायंदे
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे

पीसीपीएनडीटी आपण सदस्य आहोत. कायद्यानुसार या गंभीर प्रकारात जो जो असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. हा खूप मोठा निषकळजीपणा आहे सोबतच ज्या कवट्या सापडल्या तो तर प्रकार आणखी गंभीर ठरू शकतो. त्यामुळे कायद्याच्या पळवाटा शोधणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशीच आमची भूमिका आहे.

चेतन व्यास

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 17, 2022 | 6:10 PM

वर्धा : आर्वी येथील कदम रुग्णालयाच्या अवैध गर्भपात प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. आज याच प्रकरणाची माहिती घेण्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्ता आमदार मनीषा कायंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसाह पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांची चौकशी करत कोणीही सुटता कामा नये अशी मागणी केलीय. याप्रकारणाचा संपूर्ण अहवाल आरोग्यमंत्रीसह मुख्यसचिवांना देणार असून प्रकरणात आरोपीला शिक्षा व्हावी, या दृष्टीने मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून वैद्यकीय कायद्याचा ज्ञान असलेले शासकीय वकील देण्याची मागणी करणार असल्याच कायंदे यांनी सांगितलंय.

कायद्याच्या पळवाटा शोधणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे

आर्वी प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा समोर आलाय. फॉरेन्सिक, आरोग्य आणि पोलीस प्रशासनाचा तपास सुरू आहे. पीसीपीएनडीटी आपण सदस्य आहोत. कायद्यानुसार या गंभीर प्रकारात जो जो असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. हा खूप मोठा निषकळजीपणा आहे सोबतच ज्या कवट्या सापडल्या तो तर प्रकार आणखी गंभीर ठरू शकतो. त्यामुळे कायद्याच्या पळवाटा शोधणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशीच आमची भूमिका आहे. लवकरच या प्रकरणात आपण पीसीपीएनडिटीची सदस्य म्हणून चौकशी केली आहे. त्याचा अहवाल देखील लवकरच आरोग्य आपण देणार आहोत.

शासकीय रुग्णालयाचा साठा खाजगी रुग्णालयात कसा आला?

कदम यांच्या रुग्णालयात शासकीय रुग्णालयातील औषधे जे सापडले, शासकीय रुग्णालयाचा साठा खाजगी रुग्णालयात कसा आला. याचा शोध घेण्याची गरज आहे. उपजिल्हा रुग्णालयातून चोरून हा साठा येथे ठेवला गेला का? याकडे तपास यंत्रणेचे लक्ष आमदार मनीषा कायंदे लक्ष वेधले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून वैद्यकीय कायद्याचे ज्ञान असणारे सरकारी वकील यात लावणे आवश्यक आहे. त्यांच्या ज्ञानाचा यात फायदा होणार आहे. ज्यामुळे केस अधिक मजबूत करता येईल, बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्यांना पायबंद बसेल. असे जर रॅकेट असेल तर त्याचा छडा देखील पोलीस लावणार आहे असंही त्या म्हणाल्या. (MLA Manisha Kayande meets District Collector and Superintendent of Police in Arvi abortion case)

इतर बातम्या

Wardha : वर्धा गर्भपात प्रकरणी आरोग्य विभागाकडून अद्याप तक्रार नाही, आरोग्य विभागाच्या कार्याप्रणालीवर प्रश्नचिन्ह

 पोलिसांची मदत हवीय ?  डायल करा 112 अन पुढच्या 7 मिनिटात पोलिसांची मदत मिळवा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें