आधार दुरुस्ती, मोबाइल, ईमेल लिंकिंगसाठी टपाल विभागाची विशेष मोहीम, 1 ऑक्टोबरचा शेवटचा दिवस

| Updated on: Oct 01, 2021 | 11:24 AM

आधार कार्डमधील दुरुस्तीबाबत सेवा सुरु करावी, अशी लोकांची प्रचंड मागणी आहे. टपाल विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत नागरिकांना त्यांच्या आधार कार्डशी मोबाइल क्रमांक आणि मेल अद्ययावत करता येणार आहेत.

आधार दुरुस्ती, मोबाइल, ईमेल लिंकिंगसाठी टपाल विभागाची विशेष मोहीम, 1 ऑक्टोबरचा शेवटचा दिवस
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबाद: कोरोनातील लॉकडाऊनमध्ये अनेक नागरिकांचे आधार कार्डसंबंधीचे (Aadhar card) काम लांबणीवर पडले आहे. कुणाचे नाव बदलायचे आहे तर कुणाला पत्त्यात दुरुस्ती करून घ्यायची आहे. तर कुणाला आधार, मोबाइल, ईमेल लिंक (Mobile, email linking)  करायचे राहून गेले आहे. मात्र आता विविध शासकीय कार्यालयांमधून लिंकिंगसाठीचे विशेष प्रयत्न केले जात आहेत. भारतीय टपाल विभागातर्फेही (Indian Post office) गेल्या तीन दिवसांपासून यासंदर्भातील विशेष मोहीम सुरु आहे. 29 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांसाठी आधार, मोबाइल आणि ई-मेल लिंकिंगसाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे. इतर वेळीही टपाल खात्यात आधारसंबंधी दुरुस्तीची कामे होतात. मात्र या कालावधीतील अर्ज लवकरात लवकर मार्गी लावले जातील.

आधारच्या दुरुस्तीसाठी अनेकांची मागणी

आधार कार्डमधील दुरुस्तीबाबत सेवा सुरु करावी, अशी लोकांची प्रचंड मागणी आहे. टपाल विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत नागरिकांना त्यांच्या आधार कार्डशी मोबाइल क्रमांक आणि मेल अद्ययावत करता येणार आहेत. आधार लिंकिंग, पॅन कार्ड, ड्रायव्हिंड लायसन्स, पासपोर्ट काढण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याकरिता, बँक, डी-मॅट खाती उघडण्यासाठी आधार लिंक असणे गरजेचे आहे. आधार आधारित सेवांद्वारे आर्थिक व्यवहार आणि देवाण-घेवाण करणाऱ्या नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येईल. यासंबंधीच्या प्रमाणिकरणासाठी केवळ ओटीपीची आवश्यकता आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक चांगली सेवा आणि समाधान मिळू शकेल, यासाठीच या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याचे टपाल विभागाच्या संबंधित माहिती पत्रकात म्हटले आहे.

कोणत्या टपाल कार्यालयात सुविधा?

शहरातील मुख्य टपाल कार्यालय, जुना बाजार, बजाज नगर पोस्ट ऑफिस, सिडको कॉलनी पोस्ट ऑफिस, एन-7, सातारा परिसर पोस्ट ऑफिस, सातारा परिसर, वाळूज पोस्ट ऑफिस, वाळूज ग्रामपंचायत कार्यालय, क्रांती चौक पोस्ट ऑफिस, कुशल नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पोस्ट ऑफिस, चिकलठाणा इंडस्ट्रीयल एरिया पोस्ट ऑफिस, एस.टी.वर्कशॉपसमोर मुकुंदवाडी, हर्सूल पोस्ट ऑफिस, जळगाव रोड हर्सूल या पोस्टाच्या कार्यालयांमध्ये आधार कार्ड दुरुस्तीचे काम होणार आहे. ग्रामीण भागासाठी नजीकच्या कार्यालयात भेट देऊन नागरिकांनी आपली आधारकार्ड दुरुस्ती किंवा लिकिंगसंबंधीचे काम करून घ्यावे, असे आवाहन टपाल विभागातर्फे करण्यात आले आहे.

शहरात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

फार्मासिस्ट फोरम आणि दत्ताजी भाले रक्तपेठी यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. शिबिरात 101 दात्यांनी रक्तदान केले. जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त 25 सप्टेंबरला हे रक्तदान शिबीर घेण्यात आले होते.

इतर बातम्या- 

आता आधार कार्ड व्हेरिफिकेशन 20 रुपये नव्हे, तर फक्त 3 रुपयांत, जाणून घ्या सर्व काही

कोणत्याही मोबाईल क्रमांकाशिवाय आधार कार्डात बदल करू शकता, ही सर्वात सोपी प्रक्रिया