आता आधार कार्ड व्हेरिफिकेशन 20 रुपये नव्हे, तर फक्त 3 रुपयांत, जाणून घ्या सर्व काही

NPCI-IAMAI आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलताना यूआयडीएआयचे सीईओ सौरभ गर्ग यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रात आधारचा लाभ घेण्याची प्रचंड क्षमता आहे. सौरभ गर्ग यांच्या मते, काऊंटर व्हेरिफिकेशनचा दर 20 रुपयांवरून 3 रुपये करण्यात आलाय.

आता आधार कार्ड व्हेरिफिकेशन 20 रुपये नव्हे, तर फक्त 3 रुपयांत, जाणून घ्या सर्व काही

नवी दिल्लीः भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आधार कार्ड जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आधार पडताळणी शुल्कात कपात करण्याची घोषणा केलीय. सरकारने आधार कार्ड पडताळणी शुल्क 20 रुपयांवरून 3 रुपये केलेय. यूआयडीएआयचे सीईओ सौरभ गर्ग यांच्या वतीने एका कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली. या निर्णयानंतर UIDAI चे उद्दिष्ट हे आहे की, संस्था विविध सेवा आणि फायद्यांद्वारे लोकांचे जीवन सुलभ करण्यासाठी त्याच्या पायाभूत सुविधांचा लाभ घेतील.

फी कमी करण्याचा उद्देश काय?

NPCI-IAMAI आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलताना यूआयडीएआयचे सीईओ सौरभ गर्ग यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रात आधारचा लाभ घेण्याची प्रचंड क्षमता आहे. सौरभ गर्ग यांच्या मते, काऊंटर व्हेरिफिकेशनचा दर 20 रुपयांवरून 3 रुपये करण्यात आलाय. सर्व एजन्सी आणि संस्था सरकारने तयार केलेल्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या चौकटीचा योग्य वापर करू शकतात, याची खात्री करणे हा त्याचा हेतू आहे. ते म्हणाले की, लोकांचे जीवन सन्मानाने सुलभ करण्यासाठी या पायाभूत सुविधांचा वापर करणे आवश्यक आहे. आतापर्यंत 99 कोटी ई-केवायसीसाठी आधार प्रणाली वापरली गेलीय.

विशेष अलर्ट जारी

UIDAI ने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष अलर्ट जारी केलाय. UIDAI ने म्हटले आहे की, सर्व 12 अंकी संख्या आधार कार्डची मूळ संख्या नाहीत. वास्तविक आधार कार्ड प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी दस्तऐवज म्हणून वापरले जाते. अशा परिस्थितीत अनेक लोक तुमच्या आधारचा गैरवापर करतात. ही फसवणूक टाळण्यासाठी इशारा देण्यात आलाय. UIDAI ने म्हटले आहे की, आधार कार्ड धारकांच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी त्यांची ओळख पडताळली पाहिजे.
फसवणुकीशी संबंधित माहिती यूआयडीएआयने ट्विटरवर शेअर केलीय. त्यांनी माहितीमध्ये सांगितले की, सर्व 12 अंकी क्रमांक आधार नाहीत. व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक बरोबर आहे की नाही याची UIDAI च्या वेबसाईटवर पडताळणी करता येते. याशिवाय mAadhaar अॅपद्वारे पडताळणी करता येते.

आधार पडताळणी कशी करावी?

तुम्ही तुमचे आधार कार्ड पडताळणी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही करू शकता, यासाठी वापरकर्त्यांना Resident.uidai.gov.in/verify लिंकवर लॉगिन करून त्यांचा 12-अंकी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. त्यानंतर सिक्युरिटी कोड आणि कॅप्चा भरा आणि Proceed to Verify वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर 12 अंकी क्रमांकाची पडताळणी स्क्रीनवर दिसेल. हा तुमचा मूळ आधार क्रमांक आहे.

संबंधित बातम्या

New Wage Code म्हणजे काय? नोकरदारांच्या खिशावर कसा परिणाम?

ज्येष्ठ नागरिकांसाठी देशात पहिल्यांदा एल्डर लाइन टोल फ्री क्रमांक, मदतीसाठी 14567 वर करा कॉल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI